३७५ कोटींच्या आयपीओसाठी WOG Technologies Limited कडून सेबीकडे अर्ज दाखल

मोहित सोमण: डब्लूओजी वोग टेक्नॉलॉजी लिमिटेड (WOG Technologies Limited) कंपनीने आज सेबीकडे आयपीओसाठी डीएचआरपी (Draft Red Hearing Prospectus DHRP) सादर केला आहे. ३७५ कोटी रुपयांच्या इशूसाठी हा अर्ज करण्यात आला असून अद्याप प्राईज बँड निश्चित करण्यात आला नाही. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या १० रूपये प्रति शेअरप्रमाणे ४३२८०० इक्विटी शेअर्सचा हा ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे. माहितीनुसार, तर फ्रेश इशूपैकी १० रूपये दर्शनी मूल्यानुसार ३७५००.०० लाखांपर्यंत मूल्यांकन असलेल्या शेअरची विक्री करण्यात येईल असे कंपनीने पब्लिक फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चाच्या गरजेसाठी (Working Capital Requirments), बेल कुलिंग टॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अतिरिक्त ५०% भागभांडवल (Stake) खरेदी करण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. आयपीओ फायलिंगनुसार Unistone Capital Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Bigshare Services Pvt Ltd आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. बीएसई व एनएसईवर हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार असून अद्याप तारखेची निश्चिती करण्यात आलेली नाही.


एक्सचेंजमधील माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५०% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) ३०% वाटा उपलब्ध असणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ झाली असून संपूर्ण २०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) १४८७% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील तुलनेत १६६.३५ कोटी तुलनेत जून तिमाहीत ४१.६५ कोटींवर उत्पन्न (Total Income) घसरले आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मार्च महिन्यातील ४४.२४ कोटी तुलनेत ९.६८ कोटींवर घसरले होते.


यासह आर्थिक बाबतीत बघितल्यास, कंपनीच्या आयपीओपूर्व आरोई (Return on Equity) ७१.७९% व आरोसीई (Return on Capital Employed ROCE) ५१.३२% आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तर (Debt to Equity Ratio) ०.१८% आहे. सत्यपाल सिंह, सुनिल कुमार, अमृता पनवार हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८८.६२% आहे.


२०१० मध्ये स्थापन झालेल्या WOG टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने औद्योगिक आणि नगरपालिका ग्राहकांसाठी एकात्मिक पाणी (Integration of Water),सांडपाणी आणि पर्यावरणीय उपायांची रचना करून ती सेवा कंपनी पुरवते. यासह ही कंपनी विविध जागतिक क्षेत्रांमध्ये शाश्वत प्रक्रिया (Sustainable Process) पुनर्वापर (Recycle) आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते.


कंपनीच्या पोर्टफोलिओ सेवेत WOG टेक्नॉलॉजीज पाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रणाली, शून्य द्रव उत्सर्जन (Zero Liquid Emissions) उपाय,कचरा ते ऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प आणि प्रगत प्रक्रिया अभियांत्रिकी यांसारख्या सेवा प्रदान करते, जागतिक स्तरावर ईपीएसी (EPC) (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) आणि O&M (संचालन आणि देखभाल) या सेवांचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी ऊर्जा, रसायने, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया आणि नगरपालिका यांसारख्या उद्योगांना सेवा देते. अद्याप सूचीबद्ध होण्याची तारीख अनिश्चित असून पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी निर्णय घेऊ शकते.

Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

मुंबई : झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली.

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज