थंडीच्या कडाक्याने आंबा मोहरला

उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित; बागायतदारांच्या आशा पल्लवित


अलिबाग : कडाक्याच्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यातील बागांमध्ये आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर डोकावू लागला आहे.


रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी सुमारे २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मात्र यंदा उत्पादनात १० ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण कायम राहिल्याने, तसेच किडरोगाचा फारसा प्रादूर्भाव नसल्याने आंबा उत्पादनात काही प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्याची प्रक्रिया सुरू होत असते.


या पालवीला डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोहर येतो. यंदा मोहर येण्याची प्रक्रिया वेळेत सुरू झाली आहे. उत्पादनक्षम क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रावर मोहर आला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत फळधारणेचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. लवकर मोहर आलेला कोकणातील मार्च महिन्यात लवकर मोहोर आलेला वाशीच्या मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, तसेच एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल. आंबा बाजारात असेल असा अंदाज बागायतदार वर्तवत आहेत.


आंबा पिकासाठी पोषक वातावरण कायम असल्याने यावर्षी आंबा उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. सध्या कोकणातील आंबा कलमांना मोहर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यांपासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल. -संजय मोकल, (आंबा बागायतदार)

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे