शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने सोमवारी २९डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण १ हजार २२५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यारत आले आहे. तर, दिवसभरात ३५७ पत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे आजवर अर्ज भरलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ४०१ वर पोहोचली आहे.मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक निवडणूक कार्यालयात मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयत्या वेळेला उमेदवारी जाहीर केल्याने आपले अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होऊन निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली. मंगळवारी अखेरच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत अर्जाचे वितरण होईल. तर, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीेकारली जाणार आहेत.
उमेदवारी अर्ज वितरणाच्या, पाचव्या दिवशी म्हणजे सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी १ हजार २२५ उमेदवारी अर्जनाचे वितरण झाले आहे. एकूणच, या पाच दिवसात मिळून ११ हजार ५६८ उमेदवारी अर्जांचे वितरण झाले आहे. तर, सोमवारी अखेर एकूण मिळून ४०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज विक्री आणि दखल अर्ज यांची आकडेवारी :
ए + बी + ई विभाग - ६९/ २६ प्राप्त
सी + डी विभाग - १९/ ०७ प्राप्त
एफ दक्षिण विभाग - २३/ ०८ प्राप्त
जी दक्षिण विभाग - ७१/ ०७ प्राप्त
जी उत्तर विभाग - ५२/ २२ प्राप्त
एफ उत्तर विभाग - ५०/ १३ प्राप्त
एल विभाग - ३६/ १४ प्राप्त
एल विभाग - ६२/ १८ प्राप्त
एम पूर्व विभाग - ५४/ १९ प्राप्त
एम पूर्व + एम पश्चिम - ६९/ ११ प्राप्त
एन विभाग - ३६/ २३ प्राप्त
एस विभाग - ५७/ ०७ प्राप्त
टी विभाग - ७५/ १९ प्राप्त
एच पूर्व विभाग - ६८/ १९ प्राप्त
के पूर्व + एच पश्चिम विभाग - ७४/ ०८ प्राप्त
के पश्चिम विभाग + के पूर्व - ७८/ १७ प्राप्त
के पश्चिम विभाग - ७९/ २९ प्राप्त
पी दक्षिण विभाग - ४४/ ११ प्राप्त
पी पूर्व विभाग - ८६/ १९ प्राप्त
पी उत्तर विभाग - २०/ २९ प्राप्त
आर दक्षिण विभाग - ४४/ १४ प्राप्त
आर मध्य विभाग - १३/ ०४ प्राप्त
आर उत्तर विभाग - ४६/ १३ प्राप्त