धारावीत दिवंगत सुर्यवंशीच्या मुलांवर आली रडण्याची वेळ, उबाठाला आली नाही दया


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावीमध्ये आजवर उबाठा पक्षाला बळकटी देणाऱ्या राजेंद्र सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला उबाठाने यंदाच्या निवडणुकीत पूर्णपणे नाराज केले . धारावीतील प्रभाग क्रमांक १८६मधून राजेंद्र सुर्यवंशी यांची कन्या अंजली या इच्छुक होत्या. परंतु मातोश्रीवर गेल्यानंतरही अंजली आणि भाऊ चेतन यांच्या पदरी निराशाच पडली. हे भाऊ बहिण आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून आपल्या आईवडिलांचे फोटो घेवून गेले होते. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या अश्रुचा बांध फुटला गेला आणि ते आई वडिलांचे फोटो उ कवटाळून ढसा ढसा रडू लागल्या.


धारावीतील प्रभाग क्रमांक १८४मधून राजेंद्र सुयर्वशी हे सन २०१७च्या निवडणुकीत उभे राहिले होते. या प्रभागातून काँग्रेसचे बब्बू खान यांनी त्यांचा पराभव केला होता. त्याआधी राजेंद्र सुर्यवंशी आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनंदा सुर्यवंशी या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. धारावीतील शिवसेनेच्या संघटन वाढीमध्ये राजेंद्र सुर्यवंशी यांचा मोठा हात होता. परंतु कोविडनंतर राजेंद्र सुर्यवंशी आणि सुनंदा सुर्यवंशी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची कन्या अंजली सुर्यवंशी यांनी युवा सेनेच्या विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. तर त्यांचे बंधू चेतन सुर्यवंशी हे युवा सेनेचे माजी विधानसभा समन्वयक होते. उबाठाच्या युवा सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्यावर या दोन्ही भाऊ बहिणींनी आई वडिलांच्या निधनानंतर प्रयत्न केला


त्यामुळे प्रभाग क्रमांक १८६ अनुसूचित जाती महिला आरक्षित झाल्याने अंजली सुर्यवंशी यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मडियाच्या माध्यमातून प्रचार सुरु केला होता. परंतु, मातोश्रीवर रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या अर्ज वाटपामध्ये अंजली सुर्यवंशी यांना उमेदवारी अर्ज नाकारण्यात आली. राजेंद्र सुर्यवंशी यांचे निधन झाल्यानंतर उबाठाने या दोन्ही मुलांची काळजी घेणे अपेक्षित असतानाही उबाठाने या दोन्ही मुलांना उमेदवारी नाकारत त्यांचे स्वप्न चक्काचूर केले आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची चर्चा कायला मिळत आहे.


Comments
Add Comment

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणात जिल्ह्यातील ८ पंचायत

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या