मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. खराब फॉर्म आणि वाढत्या स्पर्धेमुळे ऋषभ पंतसह तीन महत्त्वाच्या खेळाडूंना संघातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या जागी घरगुती क्रिकेट पिचवर धावांचा पाऊस पाडणाऱ्या खेळाडूंचे संघात पुनरागमन होणार असल्याचे समजते. निवड समिती सध्या काही कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे ऋषभ पंत, तिलक वर्मा आणि ध्रुव जुरेल या तीन स्टार खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत हा कसोटीत चमकला तरी वन डे तील त्याची कामगिरी निराशाजनक आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या पुनरागमनामुळे मधल्या फळीत खेळणाऱ्या तिलकला बसावे लागेल असे दिसते. संघासाठी यष्टीरक्षक निश्चित असल्यामुळे ध्रुव जुरेलला संघाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे.
दिग्गजांचे कमबॅक
- शुभमन गिल: दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार म्हणून शुभमन गिलचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
- हार्दिक पांड्या: पूर्णपणे तंदुरुस्त असलेला हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून पुन्हा वनडे जर्सीत दिसणार आहे.
- ईशान किशन: घरगुती क्रिकेट आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपला दावा मजबूत केला आहे.
- श्रेयस अय्यर: दुखापतीमुळे बाहेर असलेला अय्यर बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत असून, तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे वेळापत्रक
- ११ जानेवारी २०२६: पहिली वनडे (वडोदरा)
- १४ जानेवारी २०२६: दुसरी वनडे (राजकोट)
- १८ जानेवारी २०२६: तिसरी वनडे (इंदूर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेसाठीचा संभाव्य १५ खेळाडूंचा संघ
भारतीय संघ (संभाव्य १५) : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रिंकू सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (किंवा मोहम्मद सिराज), मयंक यादव, हर्षित राणा, अक्षर पटेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल अपडेट?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे, ते या टी२० मालिकेत दिसणार नाहीत. त्यांच्या जागी युवा फलंदाजांना आजमावले जात आहे. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मात्र हे दोन्ही दिग्गज खेळताना दिसतील. विजय हजारे ट्रॉफीमधील त्यांची कामगिरी पाहता, ते पूर्णपणे फिट असून २०२७ च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी त्यांनी खेळणे गरजेचे आहे. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच नेतृत्व करेल, तर टी२० मध्ये शुभमन गिल किंवा सूर्यकुमार यादव यांच्याकडे धुरा असेल.