झेलेन्स्की आणि ट्रम्प भेटीपूर्वी रशियाचा युक्रेनवर हल्ला! लष्करी बळाचा वापर करणार, पुतिनचा इशारा

अमेरिका: गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून दोन्ही देशातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या युद्धाचा परिणाम फक्त दोन देशांना नाही तर अनेक देशांवर होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबले पाहिजे अशी भूमिका जवळपास देशांची आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा सुरू असताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की रविवारी फ्लोरिडा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकीत सुरक्षेची गॅरंटी आणि प्रादेशिक वाद यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या भेटीपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच युक्रेनला इशारा देत म्हटले की, दोन्ही देशांमधील संघर्ष शांततापूर्ण मार्गांनी संपवण्यासाठी कीव कोणतीही तत्परता दाखवत नाहीये. कारण अमेरिकेच्या प्रस्तावाला थेट युक्रेननेच विरोध केला. त्यामध्ये युक्रेनचे अध्यक्ष अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांचे अमेरिकेचे दौरे वाढले आहेत. मात्र, युक्रेन आणि अमेरिका चर्चा अयशस्वी झाली तर रशिया त्यांचे 'विशेष सैन्य कारवाई'चे ध्येय पूर्ण करण्यासाठी बळाचा वापर करेल, असे पुतिन म्हणाले आहेत.


झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची चर्चा होणार असतानाच पुतिन यांचे हे विधान आले आहे. ज्यात महत्त्वाचे म्हणजे २७ डिसेंबर २०२५ रोजी युक्रेनमधील कीववर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्यात आले होते. रशियाने जवळपास ५०० ड्रोन्स आणि ४० क्षेपणास्त्र युक्रेनची राजधानी कीव आणि जवळच्या भागावर डागले. या हल्ल्यात किमान एका नागरिकाचा मृत्यू झाला तर जवळपास २७ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या भेटीपूर्वी हे हल्ले करण्यात आले होते.


दरम्यान भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि हाच पैसा रशिया युक्रेन विरोधात लढण्यासाठी वापरत असल्याचा आरोप करत अमेरिकेने भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावला. या युद्धाच्या झळा इतरही देशांना बसत आहेत. अमेरिकेने दिलेल्या शांतता प्रस्तावाला युक्रेननेच विरोध केला. परंतु या दोन्ही देशांमधील संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच भारताच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान भारताने स्पष्ट केले की, भारत हा शांततेच्या बाजूने उभा आहे.

Comments
Add Comment

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी...

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक

भारताचा पाकिस्तानवर 'फार्मा' स्ट्राइक!

अफगाणिस्तानमध्ये भारतीय औषधांचा दबदबा काबुल : अफगाणिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे.

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन