बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत ;लोकवस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे. गावातच नाही तर शहरातही बिबट्याची दहशत वाढली आहे. शहरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे. ठाण्यासह कल्याण , मुरबाड आणि बदलापूर या शहरात बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्रीअपरात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. बदलापूरच्या आंबेशिव, कारवापाठोपाठ आता वांगणी गावात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण आहे.


बदलापूरमधील वांगणी (काराव) भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. शिवाजीनगर जुना भेंडी पाडा परिसरातील लोकवस्तीत घुसून बिबट्याने दोन कुत्र्यांची शिकार केली. भर लोकवस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिक चिंतेत आहेत. बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याचे समजताच वन विभागाचे पथक वांगणी गावात दाखल झाले. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


स्थानिकांना एक मादी बिबट्या आणि तिच्यासोबत दोन बछडे दिसले. ढोके, दापिवली, पिंपकोळी येथे तसेच वारली पाड्यातील परिसरात शुक्रवारी बिबट्या दिसला. त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.ठाणे वनविभागाने तीन ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही हा बिबट्या अद्याप अडकलेला नाही. वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे .

नागरिकांसाठी सूचना:




  • रात्रीच्या वेळी जंगलाजवळ किंवा दाट झाडीच्या परिसरात जाणे टाळा.

  • पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि त्यांना घराबाहेर एकटे सोडू नका.

  • बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.


बिबट्या दिसल्यास काय काळजी घ्यावी ? :




  1. शांत राहा: घाबरू नका आणि पळू नका, कारण बिबट्या वेगाने पळतो.

  2. मोठे दिसा: हात वर करा, मोठा आवाज करा, काठी किंवा टॉर्चचा वापर करा.

  3. हळू हळू मागे सरका: पाठ दाखवू नका आणि हळू हळू मागे फिरा.

  4. वनविभागाला कळवा: त्वरित 1926 वर फोन करून माहिती द्या.

  5. गर्दी करू नका: बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करू नका.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे