नवं वर्षाचे स्वागत कसे करावे? जाणून घ्या खास टिप्स्

मुंबई: नववर्षाच्या स्वागताला केवळ दोन दिवस उरले आहेत. नवे वर्ष, नव्या आशा, नवी स्वप्न या सर्वांसाठीचे नियोजन करण्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. मात्र या सर्वात सरत्या वर्षाचे आभार आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी आणि फिरण्याचे नियोजन अनेकांनी सुरू केले आहे.


नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण डोंगर भागांना भेट देतात. तर काही जण समुद्रकिनारी जातात. मात्र असे बरेच लोकं आहेत ज्यानी कोणत्या तरी कारणास्तव बाहेर जाण्याचा किंवा नवीन वर्ष साजरा करण्याचा प्लॅन अद्याप केलेला नाही. पण तुमच्याकडे नवीन वर्षासाठी काही खास प्लॅन झाला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण घरी राहूनही तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत खास आणि संस्मरणीय बनवू शकता.




आपलं घर हे सर्वात आरामदायी आणि बिंधास्त वावरण्याचं एक ठिकाणं आहे आणि प्रियजनांसोबत घालवलेला वेळ हा नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. थोडी तयारी, थोडी सर्जनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही तुमच्या घरातच तुमच्या माणसांसोबत सेलिब्रेशनचे वातावरणात बनवू शकता. मात्र हे तुम्ही कसे कराल, यासाठी काही टिप्स:


१. घर सजवा आणि वातावरण तयार करा
नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक उर्जेने करायची असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरात दिवे, लाईटींग किंवा लहान सजावटीच्या वस्तूंनी सजवून एक उत्सवी वातावरण निर्माण करू शकता. आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी तुमचे आवडते गाणेही लावू शकता.


२. तुमच्या प्रियजनांसोबत खास जेवणाचे नियोजन करा
तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत म्हणजेच मित्र-मैत्रिण किंवा कुटुंबासह रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत तुम्ही करू शकता. आवडीचे काही खास पदार्थ बनवा. बाहेरून काही पदार्थ मागवा. एक सुंदर टेबल सजवा आणि हलके संगीत वाजवत एकत्र जेवण करा. हे वातावरण कुटुंबाला जवळ आणेल आणि एकत्र वेळ घालवण्याची एक उत्तम संधी देईल.


३. रात्रीचा चित्रपट पाहण्याचे नियोजन करा
तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत असाल तर तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आवडीचा चित्रपट पाहण्याची योजना करू शकता. चित्रपट पाहण्याआधी हलका नाश्ता तयार करा. एकत्र चित्रपट पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो.


४. घरी एकत्र या
तुमचे मित्र आणि कुटुंबातील इतर नातेवाईकांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही आमंत्रित करू शकता आणि एक छोटी पार्टी आयोजित करू शकता. संगीत, नृत्य आणि नाश्त्याची व्यवस्था करा. तसेच, मनोरंजक वातावरण तयार करण्यासाठी काही खेळांचा समावेश करा. एकत्र नवीन वर्ष साजरे केल्याने ते एक संस्मरणीय वर्ष बनेल.


५. स्वतःसाठी वेळ काढा
तुम्ही एकटे असलात तरी, तुम्ही नवीन वर्षाचा दिवस खास बनवू शकता. चित्रपट, वेब सिरीज पाहताना किंवा पुस्तक वाचताना तुमचा आवडता पदार्थ बनवा आणि त्याचा आनंद घ्या. याव्यतिरिक्त, डायरी लिहा, ध्येये निश्चित करा. तुम्ही नवीन वर्षाचा दिवस शांतपणे आणि एकटे देखील साजरा करू शकता.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला

फेस स्टीम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे होतात . वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात,

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या

दीपिकाच्या रंगावर प्रश्नचिन्ह? ध्रुव राठीच्या व्हिडीओने उडवली बॉलीवूडमध्ये खळबळ

मुंबई : गोरे रंग पे ना इतना गुमान कर…’ हे गाणं अनेकांना परिचित आहे. मात्र सध्या बॉलीवूडमधील गोऱ्या रंगामागचं