जुन्या आणि व्यावसाियक वाहनांचे फटनेस चाचणी शुल्क महागले
मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करीत जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. यामध्ये काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट १० पटींनी वाढण्यात आले असून, त्यातच आता १५ ऐवजी १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांनाही फिटनेस शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करीत वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी पूर्वीची १५ वर्षांची मर्यादा आता १० वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १० वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क १० पटीपर्यंत वाढवण्यात आले आहे.
१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी दर दोन वर्षांनी चाचणी देणे बंधनकारक असेल. जुनी आणि प्रदूषणकारी वाहने रस्त्यांवरून कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
नव्या तरतुदींनुसार बेकायदा वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क १०० रुपये निश्चित केले आहे. दुचाकींसाठी हे शुल्क २ हजार रुपये, तीन चाकींसाठी ५ हजार रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही) नोंदणी नूतनीकरण शुल्क १० हजार रुपये असेल. याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी २० हजार रुपये आणि आयात केलेल्या चारचाकी वाहनांसाठी ८० हजार रुपये आकारले जाईल.