मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड विश्वात एक चेहरा सक्रिय आहे. मात्र त्याच्या आजवरच्या भुमिकांमुळे तो चर्चेत आला नसला तरी २०२५ मध्ये त्याने बॉलीवूडवर एक हाती विजय मिळवला आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांना मागे टाकून त्याने चाहत्यांसाठी हे वर्ष खास बनवले आहे. तो अभिनेता म्हणजे द वन अॅन्ड ऑनली 'अक्षय खन्ना'! अक्षय खन्ना २०२५ चा मोस्ट पॉप्युलर आणि लक्षणीय चेहरा ठरला आहे.
अक्षयने वर्षाच्या सुरूवातीला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात औरंगजेब ही खलनायकाची भूमिका केली. वास्तविक जीवनातील औरंगजेब ही व्यक्तीरेखा हिंदूंच्या विरोधातील असली तरी अक्षयने चित्रपटात जी अॅक्टींग केली आहे त्याचा दर्जा वरचा आहे. त्याच्या या भूमिकेवरून प्रत्यक्षात औरंगजेब कसा असेल याचा अंदाज येतो. तसेच त्याची चाल, डोळे, चेहरा, आवाज हे बारकावे पाहून या पात्रासाठी त्याने केलेला अभ्यासही लक्षात येतो.
भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा एक प्रमुख भाग बनली आहे. उत्तम कथाकथन, ...
तर वर्षाच्या अखेरीस आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटात अक्षय खन्नाच ब्लॉकबस्टर दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच चाहते खास अक्षयला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेगृहात गेल्याचीही चर्चा आहे. चित्रपटातील इतर पात्र रहमान डकैत या अक्षयच्या भुमिकेसमोर पाणी कम वाटत आहे. अक्षयच्या हिट ठरलेल्या या भुमिकांमुळे २०२५ त्याच्यासाठी खास ठरले यात काही शंकाच नाही. तर चाहत्यांनाही अक्षयच्या अभिनयाची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली.
अक्षयने यापूर्वी बॉर्डर, मोहब्बत, कुदरत, हलचल,रेस आणि बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र २०२५ मधील त्याचे दोन चित्रपट चाहत्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहेत.