पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू


बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात पॅराग्लायडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या अपघातामुळे पर्यटक आणि पॅराग्लायडिंग कोच जमिनीवर कोसळले. अपघातात मोहन सिंग नावाच्या पायलटचा मृत्यू झाला. पर्यटक गंभीर जखमी झाला आहे.


मंडी जिल्ह्यातील बारोट येथील रहिवासी असलेले मोहन सिंग एका पर्यटकासोबत 'टँडम पॅराग्लायडिंग' करत होते. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हवेत पॅराग्लायडरचा तोल बिघडला आणि लाँच साईटजवळच पॅराग्लायडर कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज 'बीर बिलिंग पॅराग्लायडिंग असोसिएशन'ने व्यक्त केला आहे.


अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने मोहन सिंग आणि जखमी पर्यटकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोहन सिंग हे गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने, सोबत असलेल्या पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे.


पॅराग्लायडिंग करताना अपघात झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे साहसी खेळांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन