धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास


सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला आहे. बॉक्स ऑफिसवर धुरंधरची तुफान चर्चा सुरू असतानाच हॉलीवूडच्या एका बिग बजेट फिल्मने सगळ्यांनाच विचारात टाकलंय. कोणताही गाजावाजा न करता हॉलिवूडचा 'Avatar Fire And Ash' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने ओपनिंगलाच ५०० कोटी कमावले आहेत. भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या तुफानदार कमाईमुळे बॉलिवूडचे अनेक प्रोजेक्टसही सावध झाले आहेत.


धुरंदरच्या काळातही या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी ठरवले आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सर्व चित्रपटाना मागे टाकले आहे. आणि चांगली कमाई देखील केली आहे. विषेश म्हणजे २०२५ च्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होऊन हॉलीवूड चित्रपटांमध्ये अवतार ३ने पहिला नंबर पटकावलाय.


दिवसागणिक कमाई (नेट):


पहिला दिवस - १९ कोटी


दुसरा दिवस - २२.५ कोटी


तिसरा दिवस - २५.७५ कोटी


चौथा दिवस - ९ कोटी


पाचवा दिवस - ९.३ कोटी


सहावा दिवस - १०.६५ कोटी


सातवा दिवस - १३.३ कोटी


एकूण - १०९.४५ कोटी


भारतामधील २०२५ चे टॉप ५ हॉलीवूड ग्रॉसर्स (नेट):


अवतार: फायर अँड ॲश - १०९.४५ कोटी (७ दिवसांत)


मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंग -१०६.०९ कोटी


एफ१ - १०२.८२ कोटी


ज्युरासिक वर्ल्ड: रीबर्थ - १००.५६ कोटी


द कॉन्ज्युरिंग: लास्ट राइट्स - ८२.११ कोटी


पहिल्या ‘अवतार’ला मागे टाकणार का?


पहिल्या अवतारने भारतात सुमारे १४१. २५ कोटी नेट कमावले होते.सध्या 'Avatar: Fire And Ash' हा अवतार फ्रँचायझीमधील सर्वात कमी कमाई करणारा भाग आहे. मात्र आतापर्यंत १०९. ४५ कोटींची कमाई झाल्याने आणि ख्रिसमस-नववर्षाच्या सुट्टीचा फायदा मिळाल्याने हा टप्पा पार करण्याच्या दिशेने चित्रपट वेगाने वाटचाल करत आहे. पण, Avatar: The Way Of Water ची ३९०.६ कोटींची विक्रमी कमाई गाठणं मात्र सध्या अशक्यच वाटत आहे.

Comments
Add Comment

Sunny Deol Batwara 1947 : 'बटवारा १९४७' च्या प्रदर्शनाआधी सनी देओल नतमस्तक; मुलगा करणसोबत घेतले गुरु गोविंद सिंग यांचे आशीर्वाद!

पटना : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बटवारा १९४७' (Batwara 1947) मुळे सध्या

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना

Actress Devolina Bhattacharjee : "माझ्या आईला वाचवा..."; आसामच्या पुरात अडकलेल्या कुटुंबाबद्दल बोलताना गोपी बहू भावूक

मुंबई : आसाममधील भीषण पुरामुळे (Assam floods) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लाखो नागरिक या नैसर्गिक आपत्तीने

Sai Pallavi : सुप्रसिद्ध अभिनेत्रीने २ कोटी रुपयांची जाहिरात नाकारली

दाक्षिणात्य (South Indian ) अभिनेत्री साई पल्लवी 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिचा लूक समोर

Sonu Nigam : "मला गाण्यापासून रोखू शकता, पण...सोनू निगमचा मोठा खुलासा म्हणाला; 'त्या' एका निर्णयामुळे बॉलिवूड म्युझिक कंपन्यांनी घातली होती बंदी!

मुंबई : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात पार्श्वगायक सोनू निगम यांनी