सॅविल्स इंडिया अहवालात स्पष्ट
मुंबई: प्रामुख्याने भारतातील महत्वाच्या प्रमुख शहरात इयर ऑन इयर बेसिसवर प्रिमियम श्रेणीतील घरांच्या किंमतीत ३६% वाढ झाल्याचे सॅविल्स इंडियाने (Savills India) अहवालात म्हटले गेले आहे. मुख्यतः बांधकाम सुरु असलेल्या अंडर कन्स्ट्रक्शन निवासी मालमत्तेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने हे दर आणखी महागले असल्याचे महत्वाचे निरिक्षण अहवालाने मांडले आहे. यासह तयार असलेल्या निवासी युनिट्स मागणीत झालेली वाढ, घरांच्या निर्मिती बांधकामातील वाढलेला खर्च यामुळे असलेला मर्यादित निवासी पुरवठा हा देखील घरांच्या किंमतीतील वाढीला कारणीभूत असल्याचे अहवालाने म्हटले. 'रेडी टू होम' या श्रेणीतील मालमत्तेला वाढीव मागणीमुळे लोकांचा कल अंडर कन्स्ट्रक्शन निवासी प्रकल्पात अधिक ओढला गेल्याने निवासी मालमत्तेतील किंमतीत आणखी वाढ होत असल्याचे संस्थेने म्हटले.
मुंबईच्या बाबतीत तर २०% तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ३०% वाढ किंमतीत झाली आहे. तर गुरूग्राम येथे २ ते १९%, नोएडा येथे ९ ते ३६%, बंगलोर येथे १३ ते १५% वाढ केवळ एका वर्षात झाली आहे असे अहवालात म्हटले गेले. लक्झरी श्रेणीतील तयार घरांच्या मागणीत व किंमतीत स्थिर वाढ (Steady Growth) कायम आहे. या श्रेणीतील किंमतीत २०% पर्यंत पातळीवर वाढ विविध शहरांमध्ये झाली. उदाहरणार्थ बंगलोर येथे अहवालानुसार १२ ते १४%, दिल्ली येथे १० ते १८%, गुरूग्राम येथे ५ ते ९%, मुंबईत ४ ते ७% वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज तयार घरांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे तयार घरांच्याही किंमतीत आणखी वाढ झाल्याचे अहवालाने आकडेवारीत म्हटले आहे.
अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५ सालात संपूर्ण भारतातील प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माण बाजारपेठ अत्यंत मजबूत राहिली. यावरून हे दिसून येते की, निवडण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसतानाही लोकांना घरे खरेदी करण्याची तीव्र इच्छा होती. तज्ञांना अपेक्षा आहे की भविष्यात किमतींमध्ये सातत्याने वाढ होत राहील. असे होण्याची शक्यता आहे कारण प्रकल्प वेळेवर पूर्ण होत आहेत आणि नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे, न की लोक केवळ नफा मिळवण्यासाठी घरे खरेदी करून नंतर विकत आहेत.
याविषयी बोलताना सॅव्हिल्स इंडियाच्या निवासी सेवांच्या व्यवस्थापकीय संचालक श्वेता जैन म्हणाल्या आहेत की,'२०२५ मध्ये, आर्थिकदृष्ट्या सक्षम अंतिम-वापरकर्त्यांची मागणी, मर्यादित तयार घरे आणि उच्च उत्पन्न गटाच्या वाढत्या संपत्तीमुळे, भारतातील प्रीमियम निवासी विभाग गृहनिर्माण बाजाराचे प्रमुख वाढीचे इंजिन म्हणून उदयास आला. चांगल्या ठिकाणी असलेल्या, नामांकित आणि सुविधांनी परिपूर्ण घरांना असलेली तीव्र पसंती, तसेच विकासकांचा गुणवत्ता आणि शाश्वततेवर असलेला भर, यामुळे किमतींमध्ये जोरदार वाढ झाली आणि खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढला.'
जैन यांनी सांगितले की, २०२६ सालाचा विचार करता, वाढती देशांतर्गत आणि परदेशी संपत्ती तसेच सुधारलेली नियामक पारदर्शकता यामुळे हा विभाग उत्साही राहील अशी अपेक्षा आहे, आणि शिस्तबद्ध किंमत निर्धारण व नियंत्रित पुरवठा हे दीर्घकालीन बाजाराच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे ठरतील.