मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या बातम्यांबाबत उत्सुकता असते. तुम्ही जर आयोगाच्या भरतीसाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे राज्य सेवा (सामान्य प्रशासन विभाग) आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (महसूल व वन विभाग) यांमध्ये एकूण ८७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ पर्यंत आहे.
या भरती प्रक्रियेत एकूण ८७ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सेवेतील ७९ आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेतील ८ जागांचा समावेश आहे. अर्जदार ३१ डिसेंबर २०२५ पासून २० जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ऑनलाईनसाठी २० जानेवारी २०२६ असून, एसबीआय चलनद्वारे ऑफलाईन शुल्क २३ जानेवारी २०२६ पर्यंत भरता येईल. या भरतीमध्ये खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ आरक्षणाचाही समावेश आहे. आयोगाने सादर केलेल्या जाहिरातीनुसार, भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. पूर्व परीक्षा, लेखी मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतील. ज्यात पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जाणार असून अंतिम निकालात त्यांचा समावेश नसेल.
मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल ...
राज्य सेवेत भरल्या जाणाऱ्या जागेमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ पदासाठी १३ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ साठी ३२ जागा, सहायक गट विकास अधिकारी गट-ब साठी ३० जागा, उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब साठी ४ जागा आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ साठी ८ जागा भरल्या जातील. उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब या पदासाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार, राज्य सेवा परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी (किमान ५५% गुणांसह), सनदी लेखापाल (CA) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, परिव्यय लेखाशास्त्र अंतिम परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य पदव्युत्तर पदवी किंवा वित्त व्यवसाय प्रशासन (MBA) पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदाकरिता पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक पदवी आवश्यक असून, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९७१ नुसार नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.