पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार


पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप) महाविकास आघाडीसोबत निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे. पक्ष पुण्यात १०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शनिवारी पुण्यातील जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रत्येकी ५० जागा लढविणार असल्याचे घोषित करण्यात आले. तर आप, वंचित व रासप यांना प्रत्येकी १२१५ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली.


कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुमारे ४ वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी तसेच त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभेसाठीही ‘आप’ने महाविकास आघाडीसाठी प्रचार केला होता. परंतु, त्याला फारसे यश मिळालेले नाही. घराणेशाही, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदींबाबत त्यांच्या नेत्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महापालिका निवडणूका न लढविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी नमूद केले.


प्रदेश प्रवक्ते किर्दत म्हणाले, “महाविकास आघाडीबरोबर मागील निवडणुकीत आपचा सहभाग फायद्याचा ठरला नाही. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीसंदर्भात स्पष्ट भूमिका नसल्यामुळे आता आपण स्वतंत्रपणे मैदानात उतरतो.” आपने पुण्यात ४१ उमेदवारांची सूची जाहीर केली असून, मुंबई, पिंपरी-चिंचवड व कोल्हापूरमध्ये प्रत्येकी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. नाशिकमधील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि इतर नेते संजय सिंह, राघव चढ्ढा यांनी प्रचारासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहितीही पक्षाने दिली आहे.


Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील