प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या, ज्ञान आणि भारताच्या भविष्यातील भूमिकेबाबत मोठं आणि चर्चेत राहणारं विधान केलं आहे. भारताला जागतिक महासत्ता बनायचं असेल, तर देशातील लोकसंख्या, कौशल्य आणि पारंपरिक मूल्यांची योग्य सांगड घालणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले असावीत, असा सल्ला दिला.


'इंडियन्स सायन्स काँग्रेस'मध्ये बोलताना नायडू यांनी लोकसंख्येला भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगितलं. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विचारांशी सहमती दर्शवत, जर भारतातील तरुणांची क्षमता योग्य दिशेने आणि राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडली गेली, तर भारताला जगातील सर्वोच्च शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या भाषणात त्यांनी १९६१ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचंही कौतुक केलं. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सभ्यतेचा वारसा जपण्याचं काम हे विद्यापीठ करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची बौद्धिक आणि शास्त्रीय ताकद नवीन नाही, हे सांगताना नायडू यांनी इतिहासातील अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. ४५०० वर्षांपूर्वीची प्रगत नगररचना, तक्षशिला आणि नालंदा यांसारखी विद्यापीठं, गणित, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, अध्यात्म आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्राचीन भारताचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं.



आर्थिक भवितव्य


भारताच्या आर्थिक भवितव्याबाबत बोलताना नायडू यांनी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच परदेशात कार्यरत असलेल्या भारतीयांच्या उच्च उत्पन्नाकडे लक्ष वेधलं. १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताने घेतलेली झेप पाहता, लवकरच भारत जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०४७ पर्यंत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



गंगा–कावेरी नदी जोड प्रकल्प


संसाधन नियोजनावर बोलताना त्यांनी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचं समर्थन केलं. गंगा–कावेरी नदी जोड प्रकल्प हे देशाचं दीर्घकाळाचं स्वप्न असल्याचं सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात जलसुरक्षेला महत्त्व दिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व राज्यांनी परस्पर सहमतीने हा प्रकल्प राबविल्यास शेती, उद्योग आणि एकूणच विकास प्रक्रियेला चालना मिळेल, असंही ते म्हणाले.


दरम्यान, लोकसंख्या नियंत्रणावर देशभरात चर्चा सुरू असताना, लोकसंख्या वाढीच्या समर्थनार्थ करण्यात आलेलं हे विधान भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय लाभांश लक्षात घेऊन केल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विकसित भारत २०४७ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुण पिढीची संख्या महत्त्वाची असल्याचं या विधानातून स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे

Indonesia: इंडोनेशियामध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४

IndiGo hikes Airfares : एटीएफच्या दरात वाढ झाल्याने इंडिगोने पुन्हा केली विमान भाडेवाढ; प्रवाशांना किती इंधन अधिभार भरावा लागेल?

मुंबई: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने पुन्हा एकदा विमान भाड्यात वाढ केली आहे. मध्य पूर्वेतील