मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या १२८, शिवसेनेच्या ७९ जागांवर एकमत; २० जागांचा पेच कायम

२० जागांचा पेच कायम; शिवसेना आणि भाजप नेते पोहोचले एकनाथ शिंदेंच्या भेटीला


मुंबई : भाजप आणि शिवसेनेत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली जागावाटपाची चर्चा अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दोन्ही पक्षांनी एकूण २०७ जागांवर एकमत दर्शवले असून, भाजप १२८ तर शिवसेना ७९ जागा लढवणार आहे. २० जागांवर अद्याप पेच कायम असल्याने, या जागांचा तोडगा काढण्यासाठी भाजप-शिवसेनेचे नेते शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले.


शनिवारी दुपारी वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी माध्यमांशी बोलताना जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले, "भाजप १२८ आणि शिवसेना ७९ अशा २०७ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित २० जागांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच तोडगा काढला जाईल. या जागांवर निर्णय घेताना समोरचा उमेदवार कोण आहे, याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. विरोधी आघाडीचा उमेदवार जर प्रबळ असेल तर त्या जागी भाजपचा की शिवसेनेचा उमेदवार उतरवायचा, हे वरिष्ठ नेते ठरवतील. गरज पडल्यास दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची अदलाबदलही केली जाईल. केवळ जागांच्या संख्याबळापेक्षा 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे निवडून येण्याची क्षमताच प्राधान्याची आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंबईतील सत्तेचा रंग बदलू पाहणाऱ्या शक्तींना परास्त करण्यासाठी महायुती पूर्णपणे सज्ज असल्याचे साटम म्हणाले. "सर्व मित्रपक्षांना समाधानकारक जागा दिल्या जातील. कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही, तर महायुती कशी जिंकते हेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्या पक्षांचे निर्णय पाहून आमचे धोरण ठरणार नाही," असेही त्यांनी नमूद केले.



गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदल - राहुल शेवाळे


शिवसेना सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले, "महायुती आता फक्त जिंकण्याचे नियोजन करत आहे. गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदल करू, दोन्ही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल. मुंबईत महायुतीने किमान १५० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पक्ष आणि जागा बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यावरच आमचा फोकस आहे," असे शेवाळे म्हणाले.



२० जागांबाबत शिंदे घेणार निर्णय


रंगशारदा येथील बैठक संपल्यानंतर लगेचच भाजप-शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर पोहोचले. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांच्यासह इतर नेते उरलेल्या २० जागांबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर जागावाटपाचा अंतिम आकडा जाहीर केला जाणार आहे.

Comments
Add Comment

नॅशनल पार्क बंद : आदिवासींच्या घरावर बुलडोझर, आंदोलकांनी केली दगडफेक

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे निर्दश समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा -

'प्रहार' Exclusive फिचर: आता किफायतशीर दरात उच्चस्तरीय हिरा शक्य? 'प्रिमियम सीवीडी' या नव्या हिरा तंत्रज्ञानासह मुंबईत मिलो जेवेल्सची घौडदौड का होतेय?

मोहित सोमण जगभरात असे म्हणतात प्राथमिक सेवा गावोगावात असतील की नाही याची शाश्वती नाही. परंतु प्रत्येक

पंतप्रधान मोदींची घोषणा: युरोप भारत करारावर 'शिक्कामोर्तब' भारताच्या ९६.६% वस्तूवर युरोपियन बाजारातील शुल्कमाफी! 'ही' आहे माहिती

प्रतिनिधी: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन युनियनबरोबर भारताचा द्विपक्षीय करार झाल्याचे अधिकृतपणे

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची "चार्जिंग!”

ईव्ही स्थानकांना प्राधान्य देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश मुंबई : बदलत्या काळाची चाहूल

Pune Crime : पुणे सुन्न! पहिली मुलगी अन् दुसऱ्यांदाही मुलगीच असल्याचं कळताच केला जबरदस्ती गर्भपात...सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

पुणे : विद्यमान सरपंच सासू आणि शिक्षक पेशात असलेल्या सासर्‍यांच्या घरात एका उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेचा