भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्येही वेगळाच उत्साह दिसून येत आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला असून आज ६०व्या वयात ही सिनेसृष्टीत तो तेवढाच सक्रिय आणि 'फिट' आहे, जेवढा तो त्याच्या तारुण्यात होता. मुळात भाईजान आता साठीचा झाला आहे हे त्याच्या दिसण्यावरून जाणवतही नाही. आजच्या वाढदिवसाची एक खास गोष्ट म्हणजे, ६०व्या वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक वर सलमानची प्रतिमा असलेली रोषणाई करत त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



सिनेसृष्टीत गेल्या तीन दशकांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या सलमानचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आणि चढ-उतारांचा राहिला आहे. सलमानने १९८८ मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून एका साहाय्यक भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळवून दिली ती १९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाने. या सिनेमासाठी त्याला सुरुवातीला केवळ ३१,००० रुपये मानधन मिळाले होते, जे नंतर वाढवून ७५,००० रुपये करण्यात आले. या चित्रपटाने सलमानला रातोरात 'स्टार' बनवले.



गाजलेले चित्रपट


सलमानच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले, पण त्याने प्रत्येक वेळी कमबॅक केले. ९० च्या दशकात त्याचे साजन, हम आपके हैं कौन, करण अर्जुन, हम दिल दे चुके सनम हे सिनेमे गाजले तर.२००९ नंतर वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, अशा काही सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तर बजरंगी भाईजान, सुलतान, टायगर जिंदा है या सिनेमांनी कोट्यावधींची कमाई करत त्याला पुन्हा सुपरस्टार केले. अशाप्रकार भाईजानने आजवर विविध साहसी, प्रेमळ भुमिकांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.

Comments
Add Comment

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर