युवा मतदाराने दिग्गजांना केले पराभूत

घोडेबाजार महायुतीसाठी ठरला निर्णायक


माथेरान निवडणून चित्र


मुकुंद रांजाणे माथेरान : शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून नगराध्यक्ष पदासाठी शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केल्याने थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चौधरी यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय असल्याने यावेळचे वारे हे महायुतीच्या बाजूने असल्यामुळे साहजिकच महायुतीला जवळपास पंधरा जागांवर नगराध्यक्ष पदासहित अधिक मताधिक्याने विजय संपादन करता आला आहे. त्यातच अस्थायिक मतांचा भरणा देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने कधी नव्हे एवढा घोडेबाजार पहिल्यांदाच घडला आहे. राजकीय वरिष्ठ मंडळींची याठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यामुळे मतदारांना दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेता आला आहे. प्रत्येक प्रभागात जेमतेम तीनशे ते चारशे मतांना अगदी सहजपणे काबूत करण्यात महायुतीच्या उमेदवारांना काहीही अडचण आली नाही. केवळ दामदुप्पट रक्कमपुढे बहुतांश मतदार हतबल झाल्याने त्यांनी जवळजवळ एकहाती मते महायुतीच्या पारड्यात टाकली. मतदारांना यावेळी नवीन चेहरा हवा असल्याने चंद्रकांत चौधरी यांनी मागील दोन वर्षांपासून जनसेवेची कामे करून मतदारांचा विश्वास संपादन केला होता. गावातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काही शासकीय अधिकारी वर्गाला अपेक्षित सत्ताधारी गट यानिमित्ताने मिळाला असल्याने त्यांचे चांगभलं या सत्तेच्या माध्यमातून होणारच आहे.


तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि युबीटी यांच्या शिवराष्ट्रमध्ये प्रमुख नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना तसेच ज्या ज्या प्रभागात धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती त्या बाबींकडे कानाडोळा केल्याने महत्त्वपूर्ण प्रभागातील जुन्या दिग्गज उमेदवारांना अपयश आले. एकूण मतदान ३४६१ इतके झाले होते. त्यातील १७३१ मते थेट नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षित होती. परंतु शिवराष्ट्र पॅनेलचे उमेदवार अजय सावंत यांना केवळ ११८८ मतांवर समाधान मानावे लागले तर प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत चौधरी यांना २२५७ मते मिळाली जवळपास १०६९ मतांनी विजय मिळवून चौधरी हे नगराध्यक्ष पदाचे दावेदार ठरले आहेत.


पंधरा जागांवर विजय प्राप्त करून नगराध्यक्ष पद महायुती कडे गेल्याने आगामी काळात सत्ताधारी गट कशाप्रकारे गावाच्या विकासाची कामे मार्गी लावून ह्या पर्यटनस्थळाला नावारूपाला आणतील हे पाच वर्षांच्या कार्यकाळात जनतेला दिसणार आहे.कारण याच सत्ताधारी गटात हटट्रिक करणारे स्वयंभू नगरसेवक शिवाजी शिंदे सारखे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या जोडीला अभ्यासू आणि राजकीय प्रदीर्घ अनुभवी नेतृत्व माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्याकडे विकासकामांचे पूर्णपणे व्हिजन आहे. त्यामुळे निश्चितच मनोज खेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सत्ताधारी मंडळी खात्रीपूर्वक या गावाचा कायापालट करू शकतात असा विश्वास समस्त माथेरानकरांना अभिप्रेत आहे.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,