मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आता पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षाचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या लढाईचे सूत्र स्पष्ट केले आहे. "जो हिन्दू हित की बात करेगा, वही 'आमची मुंबई' पर राज करेगा!!" अशा शब्दांत नितेश राणे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले असून, मुंबईची सत्ता आता केवळ हिंदूंच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांच्याच हाती राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी नितेश राणे मैदानात
मंत्री नितेश राणे हे सातत्याने हिंदूंच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या कानाकोपऱ्यात हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा हाच मूळ मंत्र पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. "मुंबई ही हिंदूंच्या अस्मितेचे केंद्र आहे आणि येथील सत्तेवर बसण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे हिंदू समाजाच्या हितासाठी ठामपणे उभे राहतील," असा संदेश त्यांच्या ट्विटमधून मिळत आहे.
मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने चाकूने लोकांवर हल्ला केल्याची धक्कादायक ...
'हिंदू विरोधी' राजकारणाला लगाम
गेल्या काही वर्षांत मुंबईत ज्या प्रकारे तुष्टीकरणाचे राजकारण झाले, त्याला छेद देण्यासाठी नितेश राणे यांनी ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जाते. मवाळ हिंदुत्व आणि स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्या 'उबाठा' गटाला नितेश राणेंनी या विधानातून आरसा दाखवला आहे. ज्यांनी हिंदूंच्या सणांवर आणि अस्मितेवर संकट आणले, त्यांना आता मुंबईकर थारा देणार नाहीत, असा थेट इशाराच राणे यांनी दिला आहे.
भाजपच्या प्रचाराचे रणशिंग!
नितेश राणे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. "आम्हाला विकासही हवा आहे आणि धर्माचे रक्षणही!" हीच भावना आता मुंबईतील घराघरांत पोहोचवण्यासाठी नितेश राणे सज्ज झाले आहेत. केवळ आश्वासनं नाही तर हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा 'नवा चेहरा' म्हणून नितेश राणेंच्या या भूमिकेकडे पाहिले जात आहे.
हिंदू अस्मितेचा फॅक्टर ठरणार निर्णायक
सोशल मीडियावर राणेंचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले असून, मुंबईच्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी आता 'हिंदुत्व' हाच सर्वात मोठा फॅक्टर ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.