सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या अपघातामध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले नसून दोन तरुणींचा नाहक बळी गेला आहे. सोलापूरातील मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ज्यात टेम्पोने दुचाकीला धडक दिली असून दुचाकीवर असलेल्या दोन जिवलग मैत्रिणींना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. या घटनेवर स्थानिकांनी संतप्त भावना दिसत आहेत.
अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची बारावीत शिकणारी मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. प्रज्ञा ही दुचाकीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या या भीषण अपघातात जिवाभावाच्या मैत्रिणींचा दुर्दैवी अंत झाला. या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल गंभीर जखमी झाल्यामुळे तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रज्ञा ही नेताजी महाविद्यालयात शिकत होती तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणींचे वय कमी असले तरी त्यांना गाडी चालवण्याची परवानगी कोणी दिली? हा प्रश्न येथे महत्त्वाचा असला तरी, समोरचा टेम्पो चालक कोणत्या वेगाने गाडी चालवत होता? गावातील रस्त्यांवर किती वेगाने गाडी चालवावी? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस मराठीचा नवा सीझन ११ ...
दरम्यान, पालघरच्या मोखाडा येथील चपलपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गाडीचा काल (२५ डिसेंबर) अपघात झाला होता. या अपघातात बारा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हे सर्व विद्यार्थी शाळेच्या क्रीडा स्पर्धेसाठी एका पिकअप गाडी मधून स्पर्धेला जात होते. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या गाडीचा अपघात झाला. गाडीतील जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, गंभीर स्थिती असलेल्या काही विद्यार्थ्यांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, नाशिकच्या खाजगी रुग्णालयामध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलाच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून इतर किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना रात्रीच घरी पाठवण्यात आले.