मुंबई मनपा निवडणुकीसाठी शुक्रवारी सात जणांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने शुक्रवारी २६ डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ०४० अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. तर, अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी, आणि गीता गवळी यांच्यासह ०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला.


महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना उमेदवारी पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ४ हजार १६५ उमेदवारी अर्जांचे तर, बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदवारी अर्जांचे वितरण झाले होते. तसेच, ०२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाली होते.


उमेदवारी अर्ज वितरणाच्या तिस-या दिवशी म्‍हणजे आज २६ डिसेंबर २०२५ रोजी २ हजार ०४० उमेदवारी अर्जांची वितरण झाले आहे. तर, ०७ उमेदवारी पत्र दाखल झाली आहेत. यामध्ये भायखळा विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०७ मधून योगिता गवळी आणि प्रभाग क्रमांक२१२ मधून माजी नगरसेविका गीता गवळी यांनी अखिल भारतीय पक्षाच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्याच इतर०७ जणांनी आपले अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज स्‍वीकारण्‍याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्‍यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. त्‍यानुसार, आजपर्यंत एकूण मिळून ९ जणांनी आपले अर्ज सादर केले.

Comments
Add Comment

माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यावर निवडणूक विभाग ठाम

जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित कळवण्याचे केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी)

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८