रेल्वेचे शेअर आज १२% पर्यंत उसळले! गुंतवणूकीच्या दृष्टीने रेल्वे शेअरकडे कसे पहावे? जाणून घ्या रेल्वे स्टॉक 'विश्लेषण'

मोहित सोमण: आज रेल्वे शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी नोंदवली गेली आहे. आयआरएफसी, आयआरसीटीसी, रेल विकास निगम लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तुफान वाढ झाली आहे. आज रेल्वे शेअर्समध्ये थेट १२% पातळीपर्यंत वाढ झाली आहे. सत्र सुरूवातीला सकाळी रेल विकास निगम (RVNL) शेअर ११.७७% पर्यंत तर आयआरसीटीसीचा शेअर २.७५%, आरआयईटीस (RITES) शेअर २.७५%, तितागढ रेल सिस्टीम शेअर शेअर २.४%, इरकॉन शेअर ३.६५%, ज्युपिटर वॅगन्स शेअर ३.३९%, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शेअर ३.२४% उसळला होता.दुपारी २.२८ वाजेपर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी उसळी घेतली आहे. आजपासून रेल्वे मंत्रालयाने वाढविलेल्या भाडेवाढीची अंमलबजावणी आजपासून होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या महसूलात वाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नुकत्याच दिल्ली मेट्रो रेल्वेच्या १०००० कोटींच्या विकासनिधीला कॅबिनेट बैठकीत मंजूरी मिळाल्याने रेल्वेबाबत एक सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे


गेल्या ६ महिन्यातील ही दुसरी दरवाढ झाली आहे. ही दरवाढ उपनगरीय रेल्वेसाठी नसून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये केल्याचे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले होते. डिसेंबर २१ ला केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीमुळे रेल्वेला वाढीव ६०० कोटींचा महसूल अपेक्षित आहे. पायाभूत सुविधा मजबूत करताना रेल्वेच्या वाढत्या खर्चामुळे दरांचे तर्कसंगतीकरण रेल्वे करत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. रेल्वेने गेल्या दोन वर्षांत प्रचंड प्रमाणात आपले नेटवर्क वाढवले आहे. वाढलेले मनुष्यबळ, खर्च, त्यामानाने नसलेला महसूल या कारणामुळे रेल्वेने दरवाढ घोषित केली होती. यापूर्वी जुलै महिन्यात ही दरवाढ रेल्वेने घोषित केली होती.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २१५ किलोमीटर मार्गिकेपर्यंत प्रवासी तिकिटात भाडेवाढ केले नसल्याचे रेल्वेनी स्पष्ट केले होते. त्यानंतर २१६ ते ७५० किलोमीटरपर्यंत ५ रूपये, ७५१ ते १२५० किलोमीटर १० रूपये, १२५१ ते १७५० किलोमीटर १५ रूपये, १७५१ ते २२५० किलोमीटर २० रूपये दरवाढ एक्स्प्रेस गाड्यांसाठी रेल्वेने घोषित केली होती. त्यासह वाढलेली तिकिटे ही मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी (वातानुकूलित व विना वातानुकूलित) (AC, Non AC) प्रति किलोमीटरमागे २ पैशाने वाढवल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते.


खासकरुन मोदी सरकारच्या काळात पायाभूत सुविधेवरील भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्यामुळे आर्थिक सु़धारणांचा सर्वाधिक फायदा पीएसयु एंटरप्राईजेसला झाल्याचे आर्थिक आकडेवारीतून यापूर्वी स्पष्ट झाले होते. उदाहरणार्थ रेल्वे कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २.५६ लाख कोटींचा महसूल उभारला होता. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये तर हा महसूल २.७० लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भांडवली खर्चात (Capital Expenditure) वाढ झाल्याने २.५२ लाख कोटींची भर पडली आहे. आगामी काळात यामध्ये ५% अधिक खर्च वाढणे अपेक्षित असताना काही आव्हाने देखील कायम आहेत. या पीएसयुचा वाढलेला ऑपरेशनल खर्च पाहता मार्जिनमध्येही मर्यादा दिसत आहेत.


या भाडेवाढीतीव निर्णयावर भाष्य करताना,'सुधारित भाडे रचनेनुसार, उपनगरीय सेवा आणि हंगामी तिकिटांच्या भाड्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ज्यामध्ये उपनगरीय आणि गैर-उपनगरीय दोन्ही मार्गांचा समावेश आहे. सामान्य नॉन-एसी (गैर-उपनगरीय) सेवांसाठी, द्वितीय श्रेणी सामान्य, स्लीपर क्लास सामान्य आणि प्रथम श्रेणी सामान्य यांमध्ये भाड्याचे श्रेणीबद्ध पद्धतीने सुसूत्रीकरण करण्यात आले आहे असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.


त्यात पुढे म्हटले आहे, द्वितीय श्रेणी सामान्यमध्ये, २१५ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही, ज्यामुळे कमी अंतराच्या आणि दैनंदिन प्रवाशांवर परिणाम होणार नाही. २१६ किलोमीटर ते ७५० किलोमीटर अंतरासाठी, भाड्यात ५ रुपयांची वाढ झाली आहे. लांबच्या प्रवासासाठी, ही वाढ टप्प्याटप्प्याने लागू केली आहे -- ७५१ किलोमीटर ते १२५० किलोमीटर अंतरासाठी १० रुपये, १२५१ किलोमीटर ते १७५० किलोमीटर अंतरासाठी १५ रुपये आणि १७५१ किलोमीटर ते २२५० किलोमीटर अंतरासाठी २० रुपये असेल.'


मंत्रालयाच्या मते, स्लीपर क्लास सामान्य आणि प्रथम श्रेणी सामान्यच्या भाड्यामध्ये गैर-उपनगरीय प्रवासासाठी प्रति किलोमीटर १ पैशाच्या दराने एकसमान सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे तिकिटांच्या किमतींमध्ये हळूहळू आणि मर्यादित वाढ होईल. असे असताना रेल्वेचा आणखी एक निर्णय म्हणजे रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या दिल्ली मेट्रोच्या कामासाठी १०००० कोटींची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीतील व्यापक व विस्तारलेल्या पायभूत सुविधेवरील ताण आणखी कमी होणार आहे.


सामान्य रिटेल गुंतवणूकदारांना रेल्वे शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रिटेल गुंतवणूकदारांचा आशा अपेक्षा वाढल्या आहेत. असे असताना लवकरच केंद्रीय व रेल्वे अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेरपर्यंत सादर होणार आहे. त्यामुळे वाढत्या अपेक्षा पाहता शेअर बाजारात या शेअर्समध्ये व्यवहार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमती प्रत्यक्ष अर्थसंकल्पीय घोषणांच्या आधीच वाढत आहेत, याचा अर्थ काही आशावाद आधीच किमतींमध्ये समाविष्ट झाला आहे. त्याचवेळी, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या वाढीची दीर्घकालीन आशा कायम राहू शकते जर अर्थसंकल्पीय तरतुदी अपेक्षा पूर्ण करत असतील आणि अंमलबजावणी योग्य मार्गावर राहिली, तर कालांतराने मूलभूत घटक रेल्वेच्या शेअरला आधार मिळू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.


अलीकडील तेजी ही मोठ्या प्रमाणात केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच्या अपेक्षांमुळे प्रेरित आहे असे म्हटले जाते. काही तज्ञांच्या मते ही नवीन कमाईतील वाढीमुळे शेअर्समध्ये वाढ झाली नाही. जर रेल्वेसाठीच्या तरतुदी बाजाराच्या अपेक्षांपेक्षा जास्त नसतील, तर अर्थसंकल्पानंतर अल्पावधीत नफावसुली होण्याची शक्यता आहे.


तज्ञ आणखी काय सांगतात?


दीर्घकाळच्या निराशाजनक कामगिरीनंतर रेल्वेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे मूल्यांकनाचा धोका एका मर्यादित राहिला असला तरी एका महिन्यातील मोठ्या तेजीमुळे आगामी काळात स्थिरता राहण्याची शाश्वती नाही. सर्वच रेल्वे कंपन्यांना समान फायदा होणार नाही ज्या कंपन्यांकडे मजबूत ऑर्डर बुक, अंमलबजावणीची क्षमता आणि विविध महसूल स्रोत आहेत, त्या मर्यादित प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या कंपन्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. म्हणजेच ज्यांचे फंडा मेटल व टेक्निकल मजबूती दाखवत असेल तर ल्पावधीच्या व्यापाऱ्यांसाठी, अर्थसंकल्पाच्या दिवसापर्यंत रेल्वेच्या शेअर्समध्ये तेजी कायम राहू शकते परंतु जोखीम व्यवस्थापन महत्त्वाचे आहे कारण या घडामोडींचा फायदा किंवा फटका शेअर्समध्ये वेळोवेळी दिसतो.


दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी केवळ अर्थसंकल्पापूर्वीच्या किमतींच्या हालचालींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी वाढत्या रेल्वे भांडवली खर्चामुळे सातत्यपूर्ण ऑर्डर मिळतात आणि त्यामुळेच कमाईत वाढ होते की नाही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक आणि निवडक गुंतवणूक केल्याने अर्थसंकल्पापूर्वीच्या टप्प्यात जोखीम व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते.


तज्ञांच्या मते, अलीकडील किमतींच्या हालचालींवरून असे सूचित होते की रेल्वेच्या शेअर्समध्ये अर्थसंकल्पापूर्वीची तेजी खरोखरच सुरू झाली आहे. शेअर्समध्ये संपूर्ण वर्षात बहुतेक काळ निराशाजनक कामगिरी केल्यानंतर, रेल्वेच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. मजबूत अर्थसंकल्पीय अपेक्षा, आश्वासक धोरणात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांची वाढलेली आवड या क्षेत्राला पुढे नेत आहेत असे म्हटले जाते.


आता ही तेजी किती काळ टिकेल हे आता आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात काय दिले जाते आणि कंपन्या सरकारी खर्चाचे स्थिर कमाईच्या वाढीत रूपांतर करू शकतात की नाही यावर अवलंबून असणार आहे दरम्यान रेल्वेचे शेअर्स भारतासाठी एक पायाभूत सुविधेतील दृष्टीने महत्वाचे शेअर आहेत. त्यामुळे हे शेअर खरेदी करताना या शेअर्समध्येही केवळ भावना न पाहता कंपनी विशेष व्यापक कामगिरी पाहिले. तज्ञांच्या मतेही अल्पावधीतील हालचालींकडे सावधगिरीने आणि स्पष्टतेने पाहिले पाहिजे.

Comments
Add Comment

रिअल इस्टेट संक्रमित अवस्थेत? घरांच्या विक्रीत १४% घसरण तर विक्री मूल्यांकनात ६% वाढ

अनारॉक अहवालाने दिलेल्या माहितीत स्पष्ट मोहित सोमण: एका नव्या अहवालानुसार रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथापालथ

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

'प्रहार' विशेष: 'वाढ ते परिवर्तन': २०२५ ने भारताच्या सर्वसाधारण विमा क्षेत्राला नव्याने आकार कसा दिला- राकेश जैन

राकेश जैन, सीईओ, इंडसइंड जनरल इन्शुरन्स २०२५ हे वर्ष भारताच्या सर्वसाधारण विमा उद्योगाच्या उत्क्रांतीमधील

Stock Market: आठवड्याची अखेर अनपेक्षित घसरणीमुळे 'या' कारणास्तव सेन्सेक्स ३६७ व निफ्टी ९९ अंकाने घसरला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स ३६७.२५ अंकाने घसरत ८५०४१.४५

दंगलीतील आरोपीला प्रवेश देणे हा शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा अपमान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जोडे चाटून मते मिळवण्याचे राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही मुंबई :

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास