मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं


मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.


हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्जमुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा