कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी एआय फॉर अॅग्री २०२६ ही जागतिक परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. एआय फॉर ॲग्री ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (एडीबी), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रापीक्स (आयसीआयएसएटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), एम.एस.स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ च्या अंमलबजावणीकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या एआय धोरणाच्या निर्मितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची प्रेरणा मिळाली. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आदींसाठी एक व्यासपीठ म्हणून परिषदेचा उपयोग करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महा एजीएक्स (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज), एआय-सक्षम ट्रेसिबिलिटी प्रणाली, एआय आधारित भू-स्थानिक बुद्धिमत्ता इंजिन, शेतकरी-केंद्रित एआय सल्ला मंच-महाविस्तार या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक केंद्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यरत असून, शासनाने पहिल्या टप्प्यात रुपये 500 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.

एआय फॉर ॲग्री २०२६

एआय फॉर ॲग्री २०२६ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित, समावेशक, हवामान-संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित कृषी परिवर्तनाला चालना देणारे हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे ‘एआय अॅग्री २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये धोरणकर्ते,आंतरराष्ट्रीय संस्था,शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी समुदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही परिषद डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम कृषी परिसंस्था निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे त्यामुळे शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे त्यांच्यासाठीही या परिषदेमध्ये माहितीपूर्ण संवादसत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

विविध चर्चासत्रांचे आयोजन

एआय फॉर ॲग्रीमध्ये दोन दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये कृषी व अन्न प्रणाली परिवर्तनासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता : सक्षमीकरण, समता आणि नेतृत्व, ॲग्री एआयसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा: डेटा, विश्वास, ट्रेसिबिलिटी आणि प्लॅटफॉर्म्स, ॲग्री एआय मधील गुंतवणूक : बाजारपेठा आणि विस्तारक्षम नवोन्मेष, जागतिक वैज्ञानिक सहकार्य आणि एआय फॉर ॲग्री संशोधन नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, धोरणात्मक मार्ग आणि जागतिक प्रशासन याविषयाचा समावेश %
Comments
Add Comment

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज

Central Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, मेन आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा प्रभावित

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, दि. १२ जुलै रोजी मेन आणि

BEST Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बसची १४ वाहनांना धडक; अनेक जखमी

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात शुक्रवारी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने बसवरील

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच रिव्हर्स मायग्रेशन सुरू होणार

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; जहाज बांधणीसह मत्स्य-बंदर क्षेत्रात असंख्य प्रकल्प येणार मुंबई :

Mumbai Redevelopment : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

 म्हाडा सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर; न्यायालयीन आणि प्रशासकीय अडचणी होणार दूर मुंबई : दक्षिण मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग झालेल्या जमिनी सरकार जमा करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश मुंबई : राज्यातील सिडको, नैना, एमएमआरडीए(MMRDA) तसेच विविध नगरपालिका आणि