मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती न झाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्ष एकत्र येऊन भाजप-शिवसेना युतीला आव्हान देण्याच्या तयारीत असली तरी, प्रत्येक घटक पक्षाने मागितलेल्या जागांची अपेक्षा जास्त असल्याने आघाडीतील नेते चिंताग्रस्त आहेत. तर, भाजप आणि शिवसेना यांनी आपली तयारी जोरदार ठेवली आहे. गेली १५ वर्षे मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने सत्ता एकट्याने मिळवली होती. त्यामुळे या निवडणुकीत युतीत भाजप मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जागांची मागणी केली असली तरी, शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युला मागितल्यामुळे युती न होण्याची शक्यता वाढली आहे.


विरोधी पक्षाने आता आपली युक्ती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मीरा-भाईंदर नेते मुजफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला आव्हान देणार आहेत. यामध्ये उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडीचे घटक पक्ष असतील. संख्याबळ अद्याप निश्चित झालेले नाही, पण लवकरच जाहीर केले जाईल.


मीरा-भाईंदर उबाठाचे नेते मनोज मयेकर यांनी सांगितले की, उबाठा आणि मनसे यांची युती झाली असून, उबाठा ८० आणि मनसे १५ जागा वाटप झाली आहेत. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी ३८ इच्छुक असून, २०-२२ जागांची मागणी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील यांनी ४७ इच्छुक असून, ३५ जागांची मागणी आघाडीकडे केली असल्याची माहिती दिली. १२ प्रभागांमध्ये एकमत झाले असून उर्वरित १२ प्रभागांमध्ये बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी ३२ उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले, पण भाजप-शिवसेना युतीबाबत अजून बोलणी झालेली नाही. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

Nitesh Rane : "जो हिंदू हित की बात करेगा..." मंत्री नितेश राणेंच्या ट्विटने विरोधकांचे धाबे दणाणले

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आता पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षाचे

रिअल इस्टेट संक्रमित अवस्थेत? घरांच्या विक्रीत १४% घसरण तर विक्री मूल्यांकनात ६% वाढ

अनारॉक अहवालाने दिलेल्या माहितीत स्पष्ट मोहित सोमण: एका नव्या अहवालानुसार रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथापालथ

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

'प्रहार' विशेष: 'वाढ ते परिवर्तन': २०२५ ने भारताच्या सर्वसाधारण विमा क्षेत्राला नव्याने आकार कसा दिला- राकेश जैन

राकेश जैन, सीईओ, इंडसइंड जनरल इन्शुरन्स २०२५ हे वर्ष भारताच्या सर्वसाधारण विमा उद्योगाच्या उत्क्रांतीमधील

Stock Market: आठवड्याची अखेर अनपेक्षित घसरणीमुळे 'या' कारणास्तव सेन्सेक्स ३६७ व निफ्टी ९९ अंकाने घसरला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स ३६७.२५ अंकाने घसरत ८५०४१.४५