IPO Overview 2025: यावर्षी आयपीओ बाजारात 'धुमाकूळ',केवळ १ वर्षात १.९५ ट्रिलियनहून अधिक निधी प्राथमिक बाजारात उभा - मोतीलाल ओसवाल

प्रतिनिधी: लोकांमध्ये गुंतवणूकीबाबत वाढलेली जनजागृती, वाढलेली उत्पादक गुंतवणूक समज व वाढलेले उत्पन्न व वाढलेल्या गुंतवणूकीबाबत आकर्षण वाढलेले असताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या असताज्या रणनीती अहवालानुसार, भारताच्या आयपीओ बाजाराने २०२५ मध्ये नवीन उंची गाठली आहे. कंपन्यांनी ३६५ पेक्षा जास्त विक्रमी १.९५ ट्रिलियन निधी आयपीओमार्फत उभारला आहे. अहवालाच्या माहितीनुसार, हे आयपीओसाठी महत्वाचे वर्ष ठरले आहे.


आर्थिक वर्ष २०२४ मध्येही मोठ्या प्रमाणात निधीची आयपीओमार्फत करण्यात आली होती. त्यामुळे हा टप्पा आधीच मजबूत असलेल्या २०२४ नंतर गाठला गेला आहे. या वर्षात एकूण ३३६ आयपीओतून १.९० ट्रिलियन निधी उभारण्यात आला आहे. अहवालानुसार केवळ या दोन वर्षांत आयपीओतून मिळून ७०१ आयपीओती ३.८ ट्रिलियन निधी उभारण्यात आला. आर्थिक वर्ष २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत जमा केलेल्या निधीची रक्कम ३.२ ट्रिलियन निधीपेक्षा जास्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले.


अहवालातील निरिक्षणानुसार एसएमई आयपीओ पेक्षा मोठ्या मेनबोर्ड लिस्टिंगचे बाजारात वर्चस्व कायम राहिले आहे. या मोठ्या आयपीओचा बोलबाला कायम असताना २०२५ साली उभारलेल्या एकूण निधीमध्ये जवळपास त्यांचा ९४% वाटा होता. एकूण या वर्षी ३६५ आयपीओ आले होते. त्यापैकी या वर्षीच्या ३६५ आयपीओतील १०६ मेनबोर्ड इश्यू होते. केवळ त्यांनीच १.८३ ट्रिलियनचे भांडवली योगदान बाजारात दिले आहे .तर उर्वरित २५९ एसएमई (SME) आयपीओने मिळून तुलनेने कमी भांडवल उभारले आहे असे अहवालाने स्पष्ट केले आहे.


उपलब्ध माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत, केवळ १९८ मेनबोर्ड कंपन्यांनी ३.६ ट्रिलियन निधी उभारला आहे, जे भांडवल निर्मितीमध्ये त्यांची मोठी भूमिका अधोरेखित करते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार या वर्षी टाटा कॅपिटलने ऑक्टोबर २०२५ मध्ये १५५ अब्ज निधी उभारला होता जो देशाच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा आयपीओ आकडेवारीनुसार ठरला आहे.


हा अहवाल क्षेत्रांच्या सहभागातील लक्षणीय विविधतेवर प्रकाश टाकतो. सेक्टरनुसार आर्थिक २०२५ मध्ये एनबीएफसी (NBFC) २६.६% वाटा घेऊन निधी उभारणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यानंतर भांडवली वस्तू, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि ग्राहक टिकाऊ वस्तूंचा क्रमांक लागतो. अहवालातील माहितीनुसार, हा २०२४ पासून एक मोठा बदल झाला आहे जिथे ऑटोमोबाईल, दूरसंचार आणि किरकोळ क्षेत्रांचे वर्चस्व होते. विशेष म्हणजे, युटिलिटीज आणि खाजगी बँकिंगसारख्या क्षेत्रांनी, जे २०२४ मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारी क्षेत्र होती. यंदा अहवालाच्या मते, आर्थिक २०२५ मध्ये आयपीओद्वारे कोणताही निधी उभारला गेलेला नाही.


अहवालातील दाव्यानुसार, गुंतवणूकदारांची मागणी यंदा मजबूत प्रमाणात राहिली आहे. गेल्या दोन वर्षांत आयपीओ सरासरी २६.६ पटीने ओव्हरसबस्क्राईब झाले. तर लहान एसएमई आयपीओमध्ये विशेषतः गुंतवणूकदारांचा अधिक रस दिसून आला, अनेक आयपीओत सबस्क्रिप्शन पातळी १०० पटीपेक्षा जास्त होती. गेल्या दोन वर्षांत सूचीबद्ध झालेल्या सुमारे ५५% मेनबोर्ड आयपीओचे शेअर्स सध्या त्यांच्या ऑफर किमतीपेक्षा जास्त किमतीवर व्यवहार करत आहेत जे लिस्टिंगनंतरची चांगली कामगिरी दर्शवत आहेत. अहवालातील निष्कर्षानुसार, आयपीओमध्ये वाढ झाली असली तरी, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट्स (QIPs) मध्ये घट झाली, आणि आतापर्यंत ७१८ अब्ज निधी उभारला गेला, जो २०२४ मधील विक्रमी १.३६ ट्रिलियनपेक्षा कमी आहे. या वर्षी QIP द्वारे उभारलेल्या निधीपैकी सुमारे ३५% वाटा केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचा होता. दरम्यान, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे २०४ अब्ज निधी उभारला गेला, जो प्रामुख्याने खाजगी प्रवर्तकांनी केलेल्या भागविक्रीमुळे होता.


मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस या ब्रोकरेज कंपनीला अपेक्षा आहे की, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकीचा सातत्यपूर्ण प्रवाह आणि म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांचा सततचा सहभाग यामुळे आयपीओची गती मजबूत राहील. अक्षय ऊर्जा, क्विक कॉमर्स आणि ॲप-आधारित व्यवसाय मॉडेल यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमुळे लिस्टिंगची पुढील लाट येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे जगातील सर्वात मोठ्या इक्विटी बाजारांपैकी एक म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होऊ शकते.

Comments
Add Comment

Imtiaz Jalil vehicle Attack : मोठी बातमी : भर रस्त्यात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर सपासप वार केले अन्... थोडक्यात बचावले; संभाजीनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

आजचे Top Stock Picks- मजबूत रिटर्न्ससाठी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार?

प्रतिनिधी: आज मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL)

चांदीतील चढउतार शिगेला: 'सकाळी उच्चांकावर,दुपारी निचांकावर' प्रति किलो सकाळी १० हजारांनी उसळली दुपारी ५००० रूपयांनी कोसळली

मोहित सोमण: चांदीतील चढउतार शिगेला पोहोचला आहे. भारतीय बाजारात सकाळच्या सत्रापासून विक्रमी वाढ झाली असताना

सेबी रियल टाईम डेटा नियमात बदल करणार 'कन्सल्टेशन पेपर' बाजारात दाखल

मोहित सोमण: सेबी (Security Exchange Board of India SEBI) या भांडवली बाजारातील नियामक मंडळाने आणखी एक महत्वाचा कन्सल्टेशन पेपर बाजारात