मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघर येथील ॲक्ट्रेकमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीच्या नव्या संशोधनानुसार विदेशी व देशी मद्याचे अगदी अल्प प्रमाणात नियमित सेवन केले तरी मुख कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. या अभ्यासानुसार मद्यपानासाठी कोणतीही ‘सुरक्षित मर्यादा’ अस्तित्वात नाही.


टाटा मेमोरियल सेंटरमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी यांनी केलेला हा अभ्यास ओपन ॲक्सेस जर्नल बी. एम. जे. ग्लोबल हेल्थमध्ये ऑनलाईन प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार दररोज केवळ एका मानक पेयाइतके मद्यपान केल्यास भारतात मुख विशेषतः बक्कल म्यूकोसा (गालांच्या आतील भाग) कर्करोगाचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी वाढतो. यामध्ये महुआ, ताडी, देशी दारू, गावठी यांसारख्या देशी मद्यांचा धोका सर्वाधिक आहे. तसेच बीअर, व्हिस्की, वाइन यांसारखी आंतरराष्ट्रीय मद्यदेखील मुख कर्करोगाचा धोका वाढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


२०१० ते २०२१ या कालावधीत बक्कल म्यूकोसा कर्करोग निश्चित झालेल्या १ हजार ८०३ रुग्णांची तुलना १ हजार ९०३ निरोगी व्यक्तींशी करण्यात आली. सहभागी व्यक्तींकडून मद्यपानाचा कालावधी, वारंवारता आणि मद्याचे प्रकार याबाबत सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. अभ्यासात ११ आंतरराष्ट्रीय आणि ३० देशी मद्यप्रकारांचा समावेश होता. या अभ्यासात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याचा धोका ६८ टक्क्यांने अधिक असल्याचे आढळून आले. देशी व विदेशी मद्द्यांच्या सेवनामुळे बक्कल म्यूकोसा कर्करोग विकसित होण्याचा धोका जवळपास दुप्पट आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या देशी मद्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा धोका सर्वाधिक आढळून आला.


टाटा मेमोरियलचे नवे संशोधन


भारतात मुख कर्करोगामध्ये बक्कल म्यूकोसा प्रमुख प्रकार


भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. संशोधकांच्या मते दरवर्षी सुमारे १ लाख ४३ हजार ७५९ नवीन रुग्ण आढळतात, तर ७९ हजार ९७९ जणांचा मृत्यू या आजारामुळे होतो. भारतीय पुरुषांमध्ये दर एक लाखांमागे सुमारे १५ इतका या आजाराचा प्रसार आहे. भारतात मुख कर्करोगाचा प्रमुख प्रकार हा बक्कल म्यूकोसा कर्करोग असून, या आजारातील केवळ ४३ टक्के रुग्ण पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जिवंत राहतात.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि