मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने चाकूने लोकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य जपानमधील एका कारखान्यात झालेल्या या चाकू हल्ल्यात चौदा जण जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यासाठी हल्लेखोराने नागरिकांवर अज्ञात द्रव पदार्थ फवारल्याची माहिती आहे. जपानच्या स्थानिक वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.
अग्निशमन विभागाचे अधिकारी तोमोहारू सुगियामा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांना दुपारी ४:३० वाजता एका रबर कारखान्यातून फोन आला होता. ज्यात पाच-सहा जणांवर कोणीतरी चाकूने हल्ला केला आणि स्प्रेद्वारे कोणते तरी विषारी द्रव फवारल्याचे सांगितले गेले. ज्यातील १४ जखमींना आपत्कालीन सेवांद्वारे रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. जिथे हल्ला झाला तो रबर कारखाना योकोहामा कंपनी चालवते. जे ट्रक आणि बसेससाठी टायर तयार करतात.
टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कॅनडामधील टोरंटो ...
दुसरीकडे जपानमध्ये हिंसक गुन्हे तुलनेने दुर्मिळ असून खून दर कमी आहे. कारण येथे हिंसेविरूद्ध कठोर कायदे आहेत. तथापि, अधूनमधून चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घटना घडतात. ज्यात २०२२ मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचा समावेश आहे. तर २०२३ मध्ये झालेल्या गोळीबार आणि चाकूहल्ल्याच्या घटनेत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चार जणांचा मृत्यू झाल्याबद्दल ऑक्टोबरमध्ये एका जपानी व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.