नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली आहे तर काही सेवांच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेल्वे तिकिटांच्या दरांवरुन असलेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. पण देशातील कोणत्याही उपनगरीय सेवेत अर्थात लोक ट्रेन सर्व्हिसमध्ये दरवाढ केलेली नाही. जाणून रेल्वेने कोणत्या गाड्यांच्या भाड्यात बदल केला आहे आणि कोणत्या सेवेत बदल केलेला नाही.
सामान्य (नॉन-एसी) गाड्यांमध्ये बदल, द्वितीय श्रेणी सामान्य
२१५ किमी पर्यंत : वाढ नाही.
२१६–७५० किमी : ५ रुपयांची वाढ
७५१–१२५० किमी : १० रुपयांची वाढ
१२५१–१७५० किमी : १५ रुपयांची वाढ
१७५१–२२५० किमी : २० रुपयांची वाढ
स्लीपर क्लास - प्रति किलोमीटर १ पैसे वाढ
स्लीपर क्लास, प्रथम श्रेणी (सामान्य) - प्रति किलोमीटर १ पैसे वाढ
स्लीपर क्लास, मेल/एक्सप्रेस (नॉन-एसी) गाड्यांमध्ये बदल
सेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लास - २ पैसे प्रति किलोमीटर वाढ
एसी क्लासमध्ये बदल
एसी चेअर कार, एसी ३ टियर / ३ई, एसी २ टियर, एसी फर्स्ट क्लास / एक्झिक्युटिव्ह क्लास - प्रति किमी २ पैसे भाडे
या गाड्यांमध्येही बदल लागू होतील.
राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्स्प्रेस, नमो भारत रॅपिड रेलसह इतर विशेष गाड्यांमध्येही हीच वर्गवारी भाडेवाढ लागू होईल.
काही महत्त्वाच्या गोष्टी
आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क इत्यादींमध्ये कोणताही बदल नाही.
जीएसटी पूर्वीप्रमाणेच लागू राहील
भाडे पूर्वीप्रमाणेच पूर्णांकित केले जाईल -
२६ डिसेंबर २०२५ पूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर नवीन भाडे लागू होणार नाही.
२६ डिसेंबर २०२५ नंतर टीटीईने बुक केलेली तिकिटे नवीन भाड्याने असतील.
माहिती आणि व्यवस्था
स्थानकांवर लावलेल्या भाडे यादी अपडेट केल्या जातील
पीआरएस, यूटीएस आणि मॅन्युअल तिकीट प्रणालींमध्ये आवश्यक बदल केले जातील
रेल्वे कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना दिल्या जातील.