नवी दिल्ली : नाताळच्या दिवशी २४ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख ३९ हजार २५० रुपये तर २२ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख २७ हजार ६५० रुपये आहे. तसेच एक किलो चांदीचा दर दोन लाख ३४ हजार रुपये आहे.
मागील काही वर्षे आयात - निर्यातीत डॉलर हे सर्वाधिक महत्त्वाचे चलन होते. पण आता भारत, चीन, रशियासह निवडक देशांनी कोट्यवधी रुपयांचे बँकेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरक्षितरित्या, अचूक आणि वेगाने करायला सुरुवात केली आहे. नव्या व्यवस्थेत डॉलर ऐवजी व्यवहारात थेट गुंतलेले दोन देश आपापसांत चलन विनिमयाचा दर निश्चित करुन व्यवहार करत आहेत. यामुळे त्यांचे डॉलरवरील अवलंबित्व कमी होऊ लागले आहे. या बदलानंतर अनेक देशांनी आपापला सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात आणि कौटुंबिक कारणांमुळे चांदीच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
किरकोळ चढउतार वगळता २०२६ मध्ये सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढीची शक्यता आहे. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून नव्या वर्षात सोन्याचांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. थेट धातू स्वरुपात सोन्याचांदीत गुंतवणूक केल्यास गरजेच्यावेळी लगेच विक्री करुन तातडीने पैसा उभा करणे शक्य आहे. यामुळेच तज्ज्ञ नागरिकांना धातू स्वरुपात सोन्याचांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
अस्वीकरण (Disclaimer) : बातमीतील माहिती संकलित स्वरुपाची आहे. खरेदी विक्रीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे आहे.