मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह, प्रक्षेपण वाहने, वैज्ञानिक मोहिमांच्या माध्यमातून स्वतःची जागतिक ओळख निर्माण केली आहे. पुढील काळात भारत मानव अंतराळ मोहिमेच्या दिशेने वाटचाल करत असून गगनयान कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक २०३५ पर्यंत उभारण्याचे, तर २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याची योजना आखण्यात आली असल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी जाहीर केले.