आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उबाठाचे पक्ष आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.


शिंदे म्हणाले की, काही युत्या या जनतेच्या विकासासाठी होतात, महायुती ही जनतेच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी आहे. पण आता झालेली युती ही सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे. तसेच युती कोणाची कोणाशीही झाली तरी आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये मजबुतीने उभी आहे. लोकसभा विधानसभा, नगरपालिकांमध्ये महायुती जिंकली. त्यामुळे अशा सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे काही फरक पडत नाही, असेही शिंदे म्हणाले.


ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी


एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेकडे यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिली. आता ही कोंबडीच कापून खायचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे; परंतु, जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार. ठाकरे बंधूंची युती झाली तरीही विठ्ठल आमच्याकडे आहे, असे शिंदे म्हणाले. यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विकासावर एकही शब्द बोलले नाहीत. यांचा अजेंडा हा फक्त सत्तेसाठी आहे. बाळसाहेबांचा विचार ज्यांनी सोडला त्यांना राज्यातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. असली काय आणि नकली काय हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.


त्यांनी मुंबईसाठी काय केले?


तसेच आम्ही विचारधारेला पुढे घेऊन जाणारे आहोत. मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यांनी मुंबईसाठी काय केले हे सांगावे. मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो यांच्यामुळे. या मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्यांच्या पुनर्विकासाचे काम आम्ही करत आहोत. रमाबाई आंबेडकरमधील १७ हजार घरांचे काम आम्ही मार्गी लावले आहे. त्यांच्याकडे काय अजेंडा आहे? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.


जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार?


एकनाथ शिंदे म्हणाले, जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी हे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार' असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास पाहिजे आहे. आम्ही घेतलेले निर्णय हे मुंबईकरांच्या हितासाठीचे आहेत. पुढच्या सहा महिन्यात मुंबई खड्डेमुक्त होणार, असे त्यांनी सांगितले. तसेच ठाकरेंनी कोरोना काळात फक्त पैसाच खाल्ला. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार? असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : १००८ खालसांना सुविधा द्या, शाही स्नान मार्ग रुंद करा- महंत संजय दास यांची मागणी

Nashik Kumbhmela : आखाड्यांसाठी आवश्यक जमीन जवळच्या परिसरात उपलब्ध करून द्यावी, शाही स्नानाच्या मार्गाचे रुंदीकरण करून

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' ५ महत्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Sikkim Landslide PM Modi : समरदुंग बोगदा अपघात प्रकरणी पंतप्रधानांनी साधला सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे अंतर्गत समरदुंग येथे

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,