माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या महापालिकेच्या एम पूर्व विभागातील मानखुर्दमधील प्रभाग १४२मधून तब्बल २१९० मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र, मागील काही वर्षांत हा प्रभाग शेवाळेंनी बांधल्यानंतर आता या प्रभागातून वैशाली शेवाळे यांनी चक्क धारावीत मोर्चा वळवला आहे.धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता राखीव झाल्याने शेवाळेंचे बालपण गेलेल्या या धारावीतून त्यांनी आता निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. सध्या वैशाली शेवाळे यांनी प्रभाग १८३मध्ये शाखा उघडून त्यातून प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे शेवाळेंच्या माध्यमातून शिवसेनेचे खाते खोलले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४२ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता आरक्षित झाल्याने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या वहिनीला निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे या प्रभाग क्रमांक १४४मधून उमेदवारी दिली होती. परंतु वैशाली शेवाळे यांनी भाजपाच्या उमेदवाराचा २१९० मतांनी पराभव करून त्या विजयी झाल्या. तर प्रभाग क्रमांक १४४मधून कामिनी मयेकर शेवाळे यांचा केवळ ४९१ मतांनी पराभव झाला होता. भाजपाच्या अनिता पांचाळ या विजयी झाल्या होत्या. मात्र, आता वैशाली शेवाळे यांचा प्रभाग क्रमांक १४२ हा आता महिला राखीव झाला. तर प्रभाग क्रमांक १४४ हा सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे.


त्यामुळे वैशाली शेवाळे यांचा महिला राखीव झाल्याने यावर शिवसेनेचा दावा असून वैशाली शेवाळे या अनुसूचित जाती महिला असल्याने त्यांना धारावीतील प्रभाग क्रमांक १८३मध्ये उतरवण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. राहुल शेवाळे आणि त्यांचे बंधू नवीन शेवाळे यांचे बालपण धारावीतच गेले आहे. त्यामुळे आपले बालपण गेलेल्या धारावीतून राहुल शेवाळेंनी आपल्या वहिनीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रभागातून परंपार नरेश पेहलवान आणि त्यांची सून निवडून आली आहे. परंतु यंदा प्रथमच हा प्रभाग अनुसूचित जाती महिलाकरता राखीव झाल्याने शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने शिवसेनेला मानखुर्दमधून धारावीत आणण्याची वेळ आली आहे. गंगा माने आणि कुणाल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची मदत शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रभागात शिवसेनेला चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच धनुष्यबाण चिन्ह असल्याने वैशाली शेवाळे यांच्यासाठी हा प्रभाग पुरक ठरण्याची शक्यता आहे. मानखुर्दमधील भागांत डॉ नवीन शेवाळे यांनी वैद्यकीय सेवा देत विभागात आपली सेवा सुरु केली होती. आता ही सेवा धारावीतील जनतेला मिळण्याची शक्यता आहे. धारावीमध्ये वकील शेख हे एकमेव शिवसेनेत असल्यामुळे भविष्यात शिवसेनेला धारावीतून अपेक्षितपणे नगरसेवक निवडून आणता येवू शकतो असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री