उद्या नाताळच्या निमित्ताने शेअर बाजार, बँका,कमोडिटी बाजार चालू राहतील का? वाचा

प्रतिनिधी:उद्या ख्रिसमस निमित्त शेअर बाजार बंद असणार आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे बाजार परवा २६ डिसेंबरला उघडणार आहे. दोन्ही बीएसई व एनएसई शेअर बाजारात ही सुट्टी लागू असणार आहे. एकूण १६ बँक सुट्यांमध्ये नाताळ (ख्रिसमस) ही एक सुट्टी मानली जाते. बँकैलाही उद्या सुट्टी असल्याने गरजेचे बँकेतील प्रत्यक्ष व्यवहार ग्राहक परवा करू शकतील. याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही परवा ट्रेडिंग करणे शक्य होणार आहे. दरम्यान बँकिंग सेवांच्या बाबतीत डिजीटल बँकिग सेवा खुल्या राहणार आहेत. युपीआय, एटीएम, इतर डिजिटल पेमेंटसाठी व्यवहार सुरळीत चालू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


शेअर बाजाराव्यतिरिक्त कमोडिटी बाजार एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) उद्या सकाळच्या सत्रासाठी बंद राहणार असून संध्याकाळचे सत्र नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. त्यानंतर शेअर बाजार थेट २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बंद राहणार आहे. दरम्यान आज शेअर बाजार घसरणीकडे वळला असला तरी विश्लेषकांच्या मते, शेअर बाजार येणाऱ्या ट्रेडिंग सत्रात चांगली कामगिरी करेल.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

बंदी असलेल्या गांजा आणि चायनीज मांजाची पुण्यात राजरोस विक्री

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या

शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान