भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा! कारण, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ३ महिने भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


विकास आराखड्यांतर्गत मंदिरात विविध तांत्रिक आणि बांधकामाची कामे करायची असल्याने मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालाला मंजुरी देताच, मंदिर नेमके कधीपासून बंद राहणार, याबाबतचा अधिकृत आदेश काढण्यात येणार आहे.


२८८ कोटींचा भव्य विकास आराखडा
भीमाशंकरच्या विकासासाठी सरकारने एकूण २८८.१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गत दर्शन रांगेचे नियोजन, पिण्याचे पाणी आणि निवासाच्या सोयीचे नियोजन, रस्ते, पार्किंग आणि परिसरातील स्वच्छतेची व्यवस्था या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता दुरुस्तीची काम करण्यात येणार आहे.




२०२७च्या कुंभमेळ्याचे नियोजन
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पर्यटक व निसर्गप्रेमी येथे भेट देतात. महत्त्वाचे म्हणजे २०२७ मध्ये नाशिक त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यावेळी वाराणसी, अयोध्या आणि उज्जैन या तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे नाशिक येथे २०२७ रोजी होणाऱ्या कुंभमेळा वेळी भीमाशंकर आणि इतर तीर्थक्षेंत्राच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यापूर्वीच सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.


दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद असताना पूजा-अर्चा किंवा पर्यायी दर्शन व्यवस्थेबाबत देवस्थान ट्रस्ट लवकरच स्पष्टीकरण देणार आहे. त्यामुळ भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे

Pune Traffic : रस्तेबंदीच्या फलकांमुळे पुणेकर चक्रावले! सायकल स्पर्धेसाठी ९ ते ६ रस्ते बंद की टप्प्याटप्प्याने? पाहा नेमके बदल काय?

पुणे : पुणे शहरात आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा