मोहित सोमण: जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा फटका म्हणून सलग चौथ्यांदा सोनेचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोन्याचांदीने आणखी एक विक्रम आज नोंदवला आहे. बाजारातील माहितीनुसार सोने आज पुन्हा किरकोळ वाढल्याने नवा विक्रमी उच्चांकावर पोहोचले असून चांदीने ७० प्रति डॉलरची पातळी केल्यानंतरही आज प्रति किलो थेट १०००० रूपयांनी वाढ नोंदवली आहे. त्यामुळे एकाच सत्रात चांदी ३.१९% पेक्षा अधिक पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली. त्यामुळे दोन्ही कमोडिटीत नवा उच्चांक गाठला गेला.' गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३८ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३५ रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २९ रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी २४ कॅरेटसाठी १३८९३, २२ कॅरेटसाठी १२७३५, १८ कॅरेटसाठी १०४२० रूपयांवर पोहोचली. तर प्रति तोळा किंमत पाहिल्यास २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ३८०,२२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ३५०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २९० रुपयांनी वाढ झाली ज्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३८९३०, २२ कॅरेटसाठी १२७३५० तर १८ कॅरेटसाठी १०४२०० रूपयांवर पोहोचले आहेत.
भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात आज दुपारपर्यंत ०.२३% वाढ झाली असून दरपातळी १३८२०५ रूपयांवर गेली. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३८९३, २२ कॅरेटसाठी १२७३५, १८ कॅरेटसाठी १०४२० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.२६% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत प्रति डॉलर सोन्याची दरपातळी ४४९१.२६ औंसवर गेली आहे.
सोने का वाढतय?
भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्यात प्रचंड मागणी वाढत आहे. त्यातुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने गोल्ड स्पॉट गुंतवणूकीत मागणी वाढत आहे. कारण अनपेक्षितपणे जीडीपीत वाढ झाल्याने युएसमध्ये पुन्हा एकदा युएस फेड व्याजदरातील कपातीच्या शक्यता नष्ट झालेल्या गुंतवणूकदारांना दिसते. त्यामुळे हा आशावाद नष्ट होताना दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाढलेला तणाव, इस्त्राईल इराण यांच्यातील मध्यपूर्वेतील मतभेद या कारणामुळे सोन्यात आणखी मागणी वाढली. दरम्यान मौल्यवान वस्तूंच्या हेजिंगमध्ये गुंतवणूकदारांनी वाढ केल्याने सोन्यातील गुंतवणूकीत महत्व प्राप्त होत आहे.
व्हेनेझुएलाच्या तेल शिपमेंटविरुद्ध वॉशिंग्टनच्या वाढलेल्या कारवाईमुळे आणि त्याला काराकासने दिलेल्या प्रतिसादामुळे प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक पुरवठ्याच्या जोखमींबद्दल चिंता वाढली असताना गुंतवणूकदार मूल्याचे रक्षण करताना मानल्या जाणाऱ्या मालमत्तांमध्ये सुरक्षित गुंतवणूक शोधत आहेत. अशा अनिश्चिततेच्या काळात सोन्याला पारंपरिकरित्या फायदा होतो याचं एकत्रित कारणांमुळे सोने आज महागले.
यासह अमेरिकेच्या सुलभ पतधोरणाच्या अपेक्षा हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे.
चांदीच्या दरात तुफान वाढ !
चांदीच्या दरात सोन्याहूनही अधिक वाढ झाल्याने चांदी प्रचंड प्रमाणात महागली आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपये, प्रति किलो दरात १०००० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २३३ रूपये, प्रति किलो दर २३३००० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २३३०, प्रति किलो २३३००० रुपयांवर सुरू आहे. केवळ गेल्या दोन दिवसात भारतीय बाजारात चांदी १४००० रुपयांनी प्रति किलो वाढली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत तब्बल १.३२% वाढ झाल्याने दरपातळी २२२५५० रूपयांवर व्यवहार करत आहे. आज चांदी थेट ३.१९% वाढल्याने चांदी आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचली होती. गेल्या वर्षभरात चांदी १४०% वाढली असून याच पार्श्वभूमीवर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढत्या भूराजकीय धोके अनिश्चितता वाढती व्याजदरात कपातीविरोधात अनास्था यामुळे बाजारात प्रतिकुलता वात आहे. तसेच अनुकूल चलनविषयक धोरणाच्या अपेक्षांमुळे जोरदार खरेदीचा ओघ सुरू झाल्याने चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सिल्वर स्पॉट फ्युचर दरात मोठ्या संख्येने वाढ झाल्याने तो ३.१९% वाढीसह २१९६५३ पातळीवर स्थिरावला. व्हेनेझुएलाच्या तेल टँकरवर अमेरिकेच्या संभाव्य कारवाईबद्दलची अनिश्चितता आणि सायबर हल्ल्यानंतर पीडीव्हीएसए (PDVSA) मधील कामकाजात झालेल्या व्यत्ययामुळे चांदीचे सुरक्षित गुंतवणुकीचे आकर्षण वाढले. त्यासह वाढलेली औद्योगिक मागणी, सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा ओघ आणि जागतिक पातळीवर साठ्यात होत असलेली चांदीची घट या एकत्रित कारणांमुळे चांदीही सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. पुढील वर्षी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून दोनदा व्याजदर कपात केली जाईल, अशी बाजाराची अपेक्षा कायम असली तरी आलेल्या जीडीपी आकडेवारचा दबाव म्हणून चांदी आणखी वाढली आहे. फेड अधिकाऱ्यांनीही मध्यम महागाई आणि नरमलेल्या श्रम बाजाराच्या पार्श्वभूमीवर धोरण शिथिल करण्याची शक्यता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे त्याचाही दबाव युएस बाजारात पडला.