नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून उड्डाणे

नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी पहिली उड्डाण सेवा सुरू होत आहे. सिडकोच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन पहिल्याच दिवशी ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्ससह होणार असून, मुंबई महानगर प्रदेशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.


सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन सुरू होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि सर्वसमावेशक विकासाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.


नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत अनेक दशकांचा प्रवास असलेल्या या प्रकल्पामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, नियोजित मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. कमळाकृती संकल्पनेवर आधारित भव्य टर्मिनल रचना ही विमानतळाची वेगळी वास्तुशिल्पीय ओळख ठरत असून, शाश्वत विकास आणि आधुनिक अभियांत्रिकीचे हे प्रतीक मानले  जात आहे.


हे विमानतळ सुरू झाल्याने नवी मुंबईसह पुणे, ठाणे, पनवेल, रायगड व कोकणातील नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच रोजगारनिर्मिती, पर्यटनवाढ आणि औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. महामार्ग, मेट्रो, रेल्वे व मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होणार आहे.

Comments
Add Comment

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

पुण्यात मोठा भाऊ कोण? एकच चिन्ह, एकत्र लढत, ठाकरे-मनसे जागावाटपावर वसंत मोरेंचं स्पष्ट मत

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे