मका, ज्वारी खरेदी-नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ

शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत संधी


मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर कारणांमुळे वेळेत नोंदणी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, आदिवासी विकास महामंडळ तसेच विविध जिल्हा स्तरावरून नोंदणीस मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.खरीप पणन हंगाम २०२४–२५ मध्ये धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडूनच शासनामार्फत आधारभूत किंमतीने धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध