८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या दृष्टीने मोठी पावले उचलली जात असून, दिल्लीतील ८०० कारखाने बंद करण्याचा निर्णय दिल्ली मंत्रिमंडळाचा मंगळवारी घेतला.
मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासंबंधी अनेक कडक निर्णय घेण्यात आले. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे यावेळी पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील सुमारे ५० टक्के बससेवा डीआयएमटीएसकडून चालवली जात होती, मात्र ही व्यवस्था आता संपुष्टात आणण्यात आली आहे. पुढे राजधानीतील सर्व बससेवा पूर्णपणे डीटीसीकडूनच चालवली जाणार आहे. यामुळे बस मार्गांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून दिल्ली सरकार होलंबी कला येथे भव्य ई-वेस्ट प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. डीपीसीसीने ४११ उद्योगांना क्लोजर नोटीस बजावली, तर पालिकेने ४०० उद्योग सील केले.