गुगलकडून व्यक्ती सुरक्षेसाठी सर्वात मोठे ईएलएस फिचर लाँच आता केवळ ११२ नंतर दाबा पुढे....

मोहित सोमण: तुमच्या आयुष्यात खूप कधी कधी संकट येते मात्र तांत्रिक सुरक्षेची वानवा असल्याने अनेकदा व्यक्तींना संकटाला सामोरे जावे लागते हेच अधोरेखित करताना गुगलने भारतात पहिल्यांदाच अँडव्हान्स सिक्युरिटी फिचर आणले आहे. लवकरच अँड्रॉईड ६.० व त्यावर ओएस असलेल्या स्मार्टफोनमध्ये इन बिल्ट गुगलचे सिक्युरिटी असलेले ईएलएस (Emergency Location Service) दाखल होईल. कंपनीकडून या फिचरचे यशस्वी टेस्टिंग झाले असून काही दिवसांत गुगल युजर्सला हे फिचर रोल आऊट करण्यात येणार आहे. अनेकदा प्रथमदर्शनी उपलब्ध असलेल्या पर्यायात आपात्कालीन फोन (Emergency Phone) करताना लोकेशन ट्रॅकिंग करताना समस्या भेडसावत असे. अचूक लोकेशनचा अभाव तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या फिचर्सला बदलण्यासाठी गुगलने ईएलएस प्रणाली बाजारात आणली आहे.


नव्या पर्यायात पैसे मोजावे लागणार नाही. हे संपूर्णपणे मोफत फिचर असल्याचे कंपनीने आपल्या माहितीत स्पष्ट केले आहे. ११२ क्रमांक डायल केल्यावरच हे फिचर युजरला वापरता येणार आहे. क्रमांक ११२ व्यतिरिक्त इतर संकटकालीन क्रमांक डायल केल्यावर हे फिचर्स आपोआप लागू होणार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची माहिती ज्यांना पाठवून निर्देशित केली गेली आहे त्यांना तंतोतंत लोकशन व इतर माहिती या फिचरमधून मिळणार आहे. ६० हून अधिक देशात गुगल हे फिचर रोल आऊट करणार आहे.


कंपनीने यावर भाष्य करताना,'आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की ही सेवा आता भारतात प्रथमच सक्रिय करण्यात आली आहे आणि उत्तर प्रदेश हे अँड्रॉइडमध्ये ELS पूर्णपणे कार्यान्वित करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांद्वारे एकत्रित आणि पर्ट टेलिकॉम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (पर्टसोल) द्वारे कार्यान्वित, ELS संपूर्ण राज्यातून 112 आपत्कालीन सेवेला दररोज मिळणाऱ्या लाखो कॉल्स आणि एसएमएस संदेशांना पाठिंबा देते' असे म्हटले.


या फिचरची गुगलने यशस्वी टेस्टिंग केली तेव्हा गुगलने आपला अनुभवही शेअर केला आहे. याविषयी अधिक बोलताना, ही सेवा राज्यातील सर्व सुसंगत अँड्रॉइड उपकरणांवर (आवृत्ती 6.0 आणि त्यापुढील) सुरू करण्यापूर्वी काही महिने प्रायोगिक तत्त्वावर तपासली गेली, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक होते. अँड्रॉइडमधील ELS ने २० दशलक्षाहून अधिक कॉल्स आणि एसएमएस संदेशांना पाठिंबा दिला असून आणि कॉल कनेक्ट झाल्यानंतर काही सेकंदातच खंडित झाले तरीही कॉलरचे स्थान ओळखले आहे ' असे आपल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे.


मशीन लर्निंगवर अवलंबून असलेल्या याअँड्रॉइड फ्यूज्ड लोकेशन प्रोव्हायडरद्वारे उपलब्ध झालेले हे फिचर मदत मागणाऱ्या व्यक्ती कोठेही असल्या तरी आपत्कालीन सेवांना अचूक स्थान प्रदान करते असेही कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले.


उत्तर प्रदेश आणि जगभरातील आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांना (Respondent) त्यांच्या सर्वात कठीण क्षणी लोकांना मदत करण्याच्या प्रेरणादायी प्रयत्नांमध्ये पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो असे म्हणत कंपनीने पुढे म्हटले आहे की,'आम्हाला आशा आहे की भारतातील इतर राज्ये देखील त्यांच्या स्थानिक आपत्कालीन सेवांच्या जीवनरक्षक हस्तक्षेपांना आणखी मजबूत करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा शोध घेतील.'

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७