Gold Silver Rate: सोन्याची १४०००० चांदीची २२५००० रूपयांवर घौडदौड! सोनेचांदीत 'त्सुनामी'? वाचा जागतिक कारणमीमांसा...

मोहित सोमण:भूराजकीय अस्थिरतेत मोठ्या प्रमाणात मागणीमुळे आज सलग तिसऱ्यांदा सोने व चांदीने विक्रमी आकडा गाठला आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर जवळपास १४०००० पातळीवर सरकत असून चांदीचे दरही २२५००० पातळीवर मार्गक्रमण करत आहेत. कारण गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २४०, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २२०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १८० रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी २४ कॅरेटसाठी १३८५५, २२ कॅरेटसाठी १२७००, १८ कॅरेटसाठी १०३९१ रूपयांवर पोहोचले आहे. तसेच संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह मुख्य शहरातील अंदाजे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३८५५, २२ कॅरेटसाठी १२७००, १८ कॅरेटसाठी १०३९१ रूपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळा किंमत पाहिल्यास २४ कॅरेटसाठी दरपातळी १३८५५०, २२ कॅरेटसाठी १२७०००, १८ कॅरेटसाठी १०३९१० रूपयांवर पोहोचली आहे.


भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक १.०८% उसळल्याने सोन्याचे दर १३८२२१ रूपयांवर गेले आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात इंट्राडे १.५०% पेक्षा अधिक पातळीवर वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या दराचा मानक असणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.८२% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४३८०.५५ औंसवर गेली होती. आज मोठ्या प्रमाणात सोन्यात वाढ झाल्याने दरपातळी सराफा बाजारात सोने महागले आहे. आजही इतर सहा करन्सी बास्केट तुलनेत डॉलरमध्ये घसरण झाली आहे. पुन्हा एकदा युएस बाजारातील फेड व्याजदर कपातीची आश्वासकता निर्माण झाल्याने आज सोन्याच्या मागणीत दबाव वाढला आहे. डॉलर घसरल्याने त्याचा गोल्ड स्पॉट गुंतवणूकदारांना अधिक फटका बसत असताना पुरवठ्यापेक्षा आणखी मागणी वाढल्याने सोने आणखी महागले आहे.


दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढल्यानेही किंमतीवर परिणाम केला आहे. गेल्या पाच सत्रात सातत्याने सोन्याच्या गोल्ड ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत वाढ होत असल्याने मोठी आवक बाजारात येत आहे. यासह नुकत्याच जाहीर झालेल्या हेडलाईन्स इन्फेक्शनमध्ये (महागाईत) युएस बाजारात घसरण झाली होती तर ग्राहक महागाई निर्देशांकातही इयर ऑन इयर बेसिसवर घसरण झाली होती. युएस व्हेनेझुएला यांच्यातील तणावा व्यतिरिक्त अद्याप रशिया युक्रेन, इस्त्राईल इराण यांच्यातील तणाव कायम असताना असुरक्षित काळातील गुंतवणूक म्हणून सोन्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय बाजारातही सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने आणखी दबाव कमोडिटीत दिसून आला. इयर टू डेट (YTD) बेसिसवर सोन्यात ७०% वाढ या आर्थिक वर्षात झाल्याचे पहायला मिळत आहे.


चांदीच्या दरातही तुफान वाढ -


चांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही भूराजकीय अस्थिरतेचा फटका बसला आहे. युएस मध्ये विशेषतः इतर धातूंच्या तुलनेत चांदीला गुंतवणूक म्हणून विशेष महत्व आल्याने चांदीच्या गुंतवणूक गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून चांदी उभरली असताना दुसरीकडे युएस फेड व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादासह चांदीला वाढलेली मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी व त्यामानाने कमी असलेला पुरवठा या कारणामुळे चांदी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. जगभरात चांदी गेल्या ५ आठवड्यात ३७% वाढ नोंदवली असून आज ७० डॉलरचा आकडा चांदीने आज पार केला आहे.


गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ४ रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात ४००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी २२३ रूपये, प्रति किलो चांदी २२३००० रूपयांवर पोहोचले आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील मुख्य शहरातील चांदीचे अंदाजे दर प्रति १० ग्रॅम २२३० रूपये, प्रति किलो दर २२३००० रूपयांवर पोहोचले आहेत. गेल्या २० दिवसात चांदीच्या ईपीएफ गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात १.२७% वाढ झाल्याने दरपातळी २१५५६६ रूपयांवर पोहोचले आहेत.


गेल्या १० दिवसांपासून सोन्याच्या प्रति ग्रॅम किंमतीत ३०० रूपयाहून अधिक वाढ झाली असून प्रति किलो चांदीत २६००० रूपयांनी वाढ झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या देशांतर्गत स्पॉट किमतींमध्ये या वर्षात आतापर्यंत ७६% वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतींमध्ये २०२५ मध्ये आतापर्यंत जवळपास ७०% वाढ नोंदवली गेली असून १९७९ नंतरची ही सर्वाधिक कमोडिटीतील वाढ आगामी काळात ठरु शकते असे तज्ञांचे मत आहे. चांदीमध्ये तर यापेक्षा अधिक वाढ झाल्याने या वर्षात आतापर्यंत तिच्या किमती १४०% वाढल्या असून देशांतर्गत स्पॉट चांदीच्या किमती या वर्षी १४२% पेक्षा जास्त पातळीवर वाढल्या आहेत.

Comments
Add Comment

शेअर बाजारात 'कंसोलिडेशन' मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सेन्सेक्स २४४.९८ अंकाने घसरत ८३३८२.७१ व निफ्टी ६६.७० कोसळला!

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या फटक्यामुळे आजही शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे अखेरच्या सत्रात सेन्सेक्स

क्वाड्रंट फ्युचर टेक शेअरमध्ये ९% वाढ 'या' कारणामुळे तरीही शेअर विकण्याचा तज्ञांचा सल्ला!

मोहित सोमण: क्वाड्रंट फ्युचर टेक शेअर्समध्ये आज तुफान वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर इंट्राडे ९% पातळीवर उसळला असून

सोन्याचांदीत 'हाहाःकार' सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९०००० प्रति किलोवर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी