मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार आहेत तर काहींनी आपल्या जोडीदाराची आपल्या चाहत्यांना ओळख करून दिली. याच लग्नाच्या हंगामात आणखी एक आपली लाडकी स्टार प्रवाह वरील अभिनेत्री आधी 'ठिपक्यांची रांगोळी' आणि 'आता लग्नानंतर होईलच प्रेम' फेम काव्या म्हणजेच ज्ञानदा विवाह बंधनात अडकणार आहे. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ज्ञानदाच्या हाताला मेहंदी लागलेली असून घरी लगीन घाई हि सुरु झाली आहे हे कळते आहे.
तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिने नेल्स एक्सटेंशन केले आहे ज्यामध्ये तिने तिचा साखरपुडा होत असल्याचा उल्लेख केला आहे. तर आणखी एक व्हिडिओ शेअर करून तिने एका मुलाच्या हातात हात दिल्याचं पाहायला मिळते पण तो मुलगा कोण आहे हे तिने दाखवलेले नाही. तिने त्यावर फक्त ठरलं... लवकरच कळवतो एवढं लिहिल आहे . ज्ञानदाच्या होणाऱ्या नवरदेवाचा चेहरा या व्हिडिओमध्ये न दिसल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात ती स्वतःहून आपला होणारा नवरा कोण हे कळवेलच.
ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने स्टार प्रवाह वरील शतदा प्रेम करावे या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केलेली. त्यानंतर तिने काही मालिका केल्या, धुरळा या सिनेमातील अमेय वाघ आणि सई ताम्हणकर सोबत काम केले. शिवाय तिचा मुंबई लोकल हा सिनेमा सुद्धा गाजला.
ज्ञानदाला स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अप्पू म्हणेजच अपूर्वा वर्तक कानिटकर या पात्राने तुफान लोकप्रियता दिली. मालिका संपून दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरीही या पात्राची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतही तिचे काव्य हे पात्र सुद्धा प्रेक्षकांच्या आवडीचे आणि लाडके आहे.