वर्दीला काळिमा! मुंबई सेन्ट्रलमध्ये पोलिसांचे गतिमंद मुलीशी अश्लील चाळे

मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात वर्दीतील पोलिसानेच एका गतिमंद तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली . साने गुरुजी मार्गावरील भाऊसाहेब हिरे उद्यानात हा प्रकार घडला असून, संतप्त नागरिकांनी संबंधित पोलिसाला चोप देत ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.


हिरे उद्यानात लहान मुले आणि नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक गणवेशातील पोलीस तरुणीसोबत बसलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच तो तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करू लागल्याने नागरिक संतप्त झाले.


प्रकार लक्षात येताच जमलेल्या नागरिकांनी पोलिसाला पकडून मारहाण केली. विशेष म्हणजे, उद्यानाला लागूनच पोलिस चौकी असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माहिती मिळताच ताडदेव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नशेत असलेल्या सहायक फौजदाराला ताब्यात घेतले.


प्राथमिक चौकशीत पीडित तरुणी गतिमंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित सहायक फौजदार सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असून सध्या ‘एल विभाग-२’ येथे नेमणुकीस होता. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी

मुंबईच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा!

मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने

‘मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे,