कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे

कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा दगडे ४४७० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या डॉ. स्वाती लाड यांचा पराभव केला. विशेष म्हणजे दगडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. तसेच परिवर्तन विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आल्याने त्यांची निर्विवाद सत्ता कर्जत नगरपरिषदेत आली. यामध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादी-८, उबाठा गट - ४, अपक्ष - १ असे १३ उमेदवार निवडून आले. तर महायुतीमध्ये शिंदे गट - ७, भाजप - १ असे आठ उमेदवार निवडून आले आहेत.


दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रायगडचे अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनीही मतमोजणी ठिकाणी भेट दिली.


निवडणुकी अगोदर गौरी जोशी, बिनिता घुमरे, रॉली पाल आणि प्रसाद डेरवणकर या उमेदवारांनी पक्ष बदलले ते सर्व या निवडणुकीत पराभूत झाले. एकदा नगराध्यक्ष झाल्यावर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येत नाही. असा कर्जतचा इतिहास आहे. मात्र माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी तो इतिहास खोडून टाकला व त्या १३९७ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. या निवडणुकीत महेंद्र चंदन हे सर्वात जास्त म्हणजे १०६७ मताधिक्य घेऊन विजयी झाले. तसेच कर्जत नगर परिषद स्थापन झाल्यापासून प्रत्येक वेळी लाड आणि ओसवाल नावाचे नगरसेवक होते.

Comments
Add Comment

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय - शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने