मोहित सोमण: निसस फायनान्स सर्विसेस (Nisus Finance Services NIFCO) इन्व्हेसमेंट व फंड मॅनेजर कंपनीने युएई येथे ५३६ कोटींची गुंतवणूक केली असल्याचे जाहीर केले आहे. दुबई मोटर येथे कंपनीने एक इमारत प्रकल्पाची उभारणी केली असून त्यासाठी लागलेल्या बांधकाम खर्च, व्यवहार खर्च, नूतनीकरण खर्च असा एकत्र मिळून ही ५३६ कोटीची गुंतवणूक केली असल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये आज स्पष्ट केले आहे. कंपनी फंड मॅनेजर देखील असून इन्व्हेसमेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून रियल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूकीत विशेषज्ञ कंपनी म्हणून ओळखली जाते. मुंबईस्थित कंपनीने निसस हाय यील्ड ग्रोथ फंड (Nisus High Growth Fund) या डिआय एफसी येथे असलेल्या फंडातून देय (Payments) दिले असल्याचेही कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पूर्ण झालेले लूताह अव्हेन्यू हे एक फ्रीहोल्ड निवासी बांधकाम प्रकल्प आहे. २७३ युनिट्सचा समावेश असुन ११० स्टुडिओ, ११० एक-बेडरूम अपार्टमेंट आणि ४४ दोन-बेडरूम अपार्टमेंट्स, तसेच एक वैद्यकीय केंद्र आणि आठ रिटेल विक्री दुकाने असल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. ही इमारत दोन तळघर, एक तळमजला, २३ निवासी मजले असलेली असून माहितीनुसार ही इमारत १३,५३३.०९ चौरस मीटरच्या भूखंडावर वसलेली आहे.
या प्रकल्पाला एमिरेट्स एनबीडी बँकेचा पाठिंबा असल्याचे . निससने आपल्या निवेदनात म्हटले. दुबईत मालमत्तेला मोठ्या प्रमाणात मागणी असताना दुबईत आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत एकूण स्थावर मालमत्ता व्यवहार १५ लाख कोटी रुपये (१७० अब्ज डॉलर्स) पर्यंत पोहोचले आहेत असे सांगितले जात आहे निवासी प्रकल्पांना वाढलेली मागणी आणि प्रादेशिक व जागतिक गुंतवणूकदारांच्या सततच्या स्वारस्यामुळे चालना या रिअल इस्टेट गुंतवणूकीत चालना मिळाली आहे असे अहवाल सांगतो. यापूर्वी १८ तारखेला कंपनीचे प्रवर्तक (Promoter) अमित गोएंका यांनी ओपन मार्केट ऑपरेशनमधून आपल्या कंपनीचे ४५२०० इक्विटी शेअरची खरेदी केली होती. त्यामुळे त्यांचे भागभांडवल (Stake) ७३.५५% वरुन ७५.२२% पर्यंत वाढला होता. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने मजबूत आर्थिक कामगिरी बजावली होती. कारण पर्यायी गुंतवणूक (Alternative Investment) मध्ये कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर ३१२% वाढ नोंदवली होती तर कंपनीला गेल्या वर्षी ६७.३ कोटींचा महसूल मिळाला होता. यापूर्वी कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये एनसीसीसीएल (New Consolidated Construction Company Limited) कंपनीचे यशस्वीपणे अधिग्रहण केले होते. कंपनी शहरी गुंतवणूक व पायाभूत सुविधा गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून देणारे आघाडीचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.
निसस ही केअरएजकडून BBB+ रेटिंग मिळवणारी पहिली भारतीय पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) कंपनी ठरली आहे. हे मानांकन तिच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स, झिरो नुकसान गुंतवणुकीचा विक्रम आणि गुंतवणूकदारांना सातत्याने मिळणाऱ्या परताव्याची पावती आहे असे लक्षात येते. या मानांकनामुळे (Standards) निससला भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्थात्मक-श्रेणीच्या एआयएफ (Alternative Investment Fund AIF) प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी २ वाजेपर्यंत ३.८९% वाढ झाल्याने शेअर २८६ रूपयांवर व्यवहार करत आहे.