भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता. सॉल्ट लेक मैदानातून मेस्सी १० मिनिटांत निघून गेल्यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी खुर्च्यांची मोडतोड करत जाळपोळ केली. यानंतर पश्चिम बंगाल सरकारने कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सत्यद्रू दत्तावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.


दत्ता याने सांगितले की, भारताच्या दौऱ्यासाठी मेस्सीला ८९ कोटी रुपये मिळाले. तर भारताला कराच्या रुपातून ११ कोटी रुपये मिळाले, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पश्चिम बंगालने कोलकाता इव्हेंटची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीसमोर बोलताना दत्ता यांनी वरील माहिती दिली. मेस्सीच्या दौऱ्याचा एकूण खर्च १०० कोटी रुपये झाला आहे. यातील ३० टक्के रक्कम प्रायोजकांमार्फत तर ३० टक्के रक्कम तिकिटांमधून गोळा करण्यात आली.

कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या इव्हेंटसाठी हजारो लोकांनी महागडी तिकीटे विकत घेतली होती. लिओनेल मेस्सीभोवती अनेक लोकांचा गराडा असल्यामुळे स्टेडियममधील लोकांना मेस्सी दिसतच नव्हता. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी स्टेडियममध्ये गोंधळ घालत मोडतोड केली. सत्येद्रू दत्ताने एसआयटीसमोर झालेल्या चौकशीत म्हटले की, कोलकाताच्या इव्हेंटसाठी केवळ १५० जणांना पासेस देण्यात आले होते. मात्र काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वतःच अनेक लोकांना मैदानावर आणले. त्यामुळे मेस्सीच्या भोवती खूप गर्दी गोळा झाली. सदर प्रभावशाली व्यक्ती मैदानात शिरल्यानंतर कार्यक्रमाची लय बिघडली आणि वेळापत्रक कोलमडले, त्यामुळे परिस्थिती चिघळली.

Comments
Add Comment

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार

भारत-न्यूझीलंड मालिकेचा निकाल इंदूरच्या ‘होळकर’वर

शुभमन गिलसाठी प्रतिष्ठेची लढाई, विजयाची परंपरा राखण्याचे आव्हान इंदूर : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२६ वर्षाची

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा