आताची सर्वात मोठी बातमी: किवी स्वस्त होणार? भारत व न्यूझीलंड एफटीए झाला!

न्यूझीलंड पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची घोषणा


मुंबई: भारताने आणखी एक भरारी घेतली आहे.ओमानशी यशस्वी बोलणी केल्यानंतर आता भारताने न्यूझीलंड बरोबर द्विपक्षीय करार (Bilateral Trade) घोषित केला आहे. या एफटीएनुसार (Free trade Agreement) मोठ्या प्रमाणात दोन्ही देशात औद्योगिक व व्यापारी सहकार्य वाढणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी सांगितले की, भारतासोबतच्या मुक्त व्यापार करारासाठीची वाटाघाटी पूर्ण झाली आहे. या मुक्त व्यापार करारामुळे (FTA) भारताला होणाऱ्या आमच्या ९५% निर्यातीवरील शुल्क कमी होईल किंवा पूर्णपणे काढून टाकले जाईल.


यामुळे आगामी काळात न्यूझीलंडची भारतातील निर्यात १.१ अब्ज डॉलरने वाढत १.३ अब्ज डॉलरवर पोहोचू शकते. भारताच्या न्यूझीलंडला केल्या जाणाऱ्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे असे म्हटले जाते. आर्थिक वर्ष २२०४-२५ मध्ये भारताची न्यूझीलंडमधील निर्यात २१४.१ दशलक्ष डॉलर होती तर न्यूझीलंडची भारतातील निर्यात ४५६.५ दशलक्ष डॉलर्स होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताची निर्यात ७११.१ दशलक्ष डॉलर्स असून आयात ५८७.१ दशलक्ष डॉलर्स होती.


मे महिन्यात सुरूवात झालेल्या या बोलणीला अंतिम मोहोर लागल्याने मोठ्या प्रमाणात न्यूझीलंडकडून भारतात होत असलेल्या ९५% निर्यात होणाऱ्या किवीला ड्युटी फ्री अथवा कमी ड्युटीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना होणार असून यातून किवी इकोसिस्टीम आणखी बळ मिळेल.


उपलब्ध माहितीनुसार, न्यूझीलंडचा सरासरी आयात शुल्क दर केवळ २.३% आहे, तर भारताचा हा दर १७.८% आहे, आणि न्यूझीलंडच्या ५८.३% शुल्क श्रेणी आधीच शुल्कमुक्त आहेत. न्यूझीलंडला होणारी भारताची निर्यात अनेक क्षेत्रांत पसरली असली तरी ती प्रामुख्याने इंधन, वस्त्रोद्योग आणि औषध उद्योगात केंद्रित असे म्हटले जाते. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या निर्यातीने ११०.८ दशलक्ष डॉलर्सने सर्वाधिक आकडेवारी नोंदवली असून त्यानंतर कपडे, कापड आणि घरगुती वस्त्रोद्योगाची निर्यातीचा क्रमांक लागतो ती साधारणतः ९५.८ दशलक्ष डॉलर्स नोंदवण्यात आली होती.


इतर उत्पादनात औषधांचीही निर्यात ५७.५ दशलक्ष डॉलर्स होती तर टर्बोजेटसह यंत्रसामग्रीचे योगदान मोठे असून ५१.८ दशलक्ष डॉलर निर्यात होती. पेट्रोलियम उत्पादने हा आणखी एक प्रमुख घटक होता, ज्यामध्ये डिझेलची निर्यात ४७.८ दशलक्ष डॉलर्स आणि पेट्रोलची निर्यात २२.७ दशलक्ष डॉलर्स होती.


इतर मोठ्या निर्यातीमध्ये ऑटोमोबाईल्स आणि सुटे भाग (१९.३ दशलक्ष डॉलर्स), कागद आणि पुठ्ठा (१८.३ दशलक्ष डॉलर्स), इलेक्ट्रॉनिक्स (१६.५ दशलक्ष डॉलर्स), लोखंड आणि पोलाद (१४.१ दशलक्ष डॉलर्स), कोळंबी (१३.७ दशलक्ष डॉलर्स), बासमती तांदूळ (११.९ दशलक्ष डॉलर्स) आणि सोन्याचे दागिने (९.९ दशलक्ष डॉलर्स) यांचा समावेश होता असे एका अहवालात म्हटले गेले होते याउलट, न्यूझीलंडच्या भारताला होणाऱ्या निर्यातीमध्ये कच्चा माल आणि कृषी उत्पादनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह लाकूड आणि लाकडी वस्तू (७८.४ दशलक्ष डॉलर्स) आणि लाकडी लगदा (३९.८ दशलक्ष डॉलर्स) कागद, पॅकेजिंग आणि बांधकाम क्षेत्रातील इकोसिस्टीममधील भारताची आयात आकडेवारी अधोरेखित करते.


कृषी आणि पशु-आधारित उत्पादने देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्यामध्ये कापलेली लोकर (४७.३ दशलक्ष डॉलर्स), मिल्क अल्ब्युमिन (३२.१ दशलक्ष डॉलर्स), सफरचंद (३२.८ दशलक्ष डॉलर्स) आणि किवी फळे (१७ दशलक्ष डॉलर्स) यांचा समावेश आहे. सेवा व्यापार हा या संबंधांचा अधिक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे.आर्थिक वर्ष २४ मध्ये, भारताची न्यूझीलंडला सेवा निर्यात २१४.१ दशलक्ष डॉलर्स होती, तर न्यूझीलंडची भारताला सेवा निर्यात ४५६.५ दशलक्ष डॉलर्स होती.


उपलब्ध माहितीनुसार, भारताची ताकद आयटी आणि सॉफ्टवेअर सेवा, दूरसंचार सहाय्य, आरोग्यसेवा आणि वित्तीय सेवांमध्ये व त्यांच्या निर्यातीत आहे. ते पुढे म्हणाले की, न्यूझीलंडच्या सेवा निर्यातीत शिक्षणाचा वाटा सर्वाधिक आहे. ज्याला भारतीय विद्यार्थ्यांमुळे चालना मिळते यानंतर पर्यटन, फिनटेक सोल्यूशन्स आणि विशेष विमानचालन प्रशिक्षणाचा क्रमांक या सहकार्यात लागतो. किवीला मोठा दिलासा भारतीय बाजारात मिळाल्याने त्याचा फायदा बाजारात दिसेल. कारण किवी फळ अनेक उत्पादनात महत्वाचे ठरते. किवी ड्युटी फ्री झाल्यास त्याचा इकडील फळ उद्योग, संबंधित औषध उद्योग, वाईन उद्योग, आरोग्य सेवा इत्यादीत होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका