अलिबाग नगरपालिकेवर शेकाप-काँग्रेसचे वर्चस्व

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या २ डिसेंबरला झालेल्या चुरशीच्या निवडणुकीनंतर आज रविवारी २१ डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे अलिबाग नगरपालिकेवर शेकाप-काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या मतमोजणीत शेकाप-काँग्रेसला १७, उबाठा २, तर भाजपचे अंकित बंगेरा यांच्या रूपाने एक जागा मिळाली. या निवडणुकीत उबाठा आणि भाजपाने अलिबाग नगरपालिकेत यानिमित्ताने शिरकाव केला असून, नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शेकापच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक विजयी झाल्या.


शेकापच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी महायुतीच्या भाजपा उमेदवार तनुजा पेरेकर यांचा सहा हजार ६४९ मतांनी पराभव केला. शेकापच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक यांना ८ हजार ९७४, तर प्रतिस्पर्धी महायुतीच्या भाजपा उमेदवार तनुजा पेरेकर यांना अवघी २ हजार ३३४ मते मिळाली. नोटाला १९० मते मिळाली. प्रभाग एकमधून संतोष मधुकर गुरव (शेकाप), संध्या शैलेश पालवणकर (शेकाप), प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील (शेकाप), प्रभाग तीनमधून डॉ. साक्षी गौतम पाटील (शेकाप), आनंद अशोक पाटील (शेकाप), प्रभाग चारमधून श्वेता संदीप पालकर (पाटील-उबाठा), संदीप जनार्दन पालकर (उबाठा), प्रभाग पाचमधून एडव्होकेट निवेदिता राजेंद्र वाघमारे (शेकाप), समीर मधुकर (हुनी) ठाकूर (काँग्रेस), प्रभाग सहामधून एडव्होकेट ऋषिकेश रमेश माळी (शेकाप), एडव्होकेट अश्विनी ऋषिकेश ठोसर (शेकाप), प्रभाग सातमधून एडव्होकेट मानसी म्हात्रे (शेकाप), एडव्होकेट अंकीत बंगेरा (भाजप), प्रभाग आठमधून एडव्होकेट निलम किशोर हजारे (शेकाप), अनिल रमेश चोपडा (शेकाप), प्रभाग नऊमधून योजना प्रदीप पाटील (शेकाप), सागर शिवनाथ भगत (शेकाप), प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत (शेकाप), वृशाली महेश भगत (शेकाप) विजयी झाले.


अलिबाग शहरातील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुलमध्ये आज सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब तहसीलदार अजित टोळकर यांनी त्यांना साह्य केले. मतमोजणी केंद्राकडे जाणारे रस्ते अलिबाग पोलिसांनी बंद केले होते. याशिवाय मतमोजणी केंद्रालाही पोलिसांचा वेढा पडल्याचे दिसून आले. निकालानंतर शेकाप-काँग्रेस, उबाठातर्फे विजयी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.


शेकाप -काँग्रेस १७, उबाठा २, भाजप १ जागा


नगराध्यक्षपदी शेकापच्या अक्षया नाईक


अलिबाग नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी मी निवडून आल्याने मला खूप आनंद झाला असून, अलिबाग नगरीच्या विकासासाठी यापूर्वी शेकापच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झाले आहेत. आता मी नगराध्यक्षपदी निवडून आल्याने माझ्या अन्य सहकाऱ्यांसह उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
-अक्षया प्रशांत नाईक
(नवनिर्वाचित नगराध्यक्षा, अलिबाग नगरपालिका)


Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,