सोन्याचांदीत 'ऐतिहासिक' वाढ! सोने १३५००० पार चांदी २२०००० जवळ का सर्वोच्च स्तरावर वाचा!

मोहित सोमण: सकाळी सोने व चांदीत विक्रमी वाढ झाली आहे. जगभरातील नव्या ट्रिगरचा लाभ सोन्याचांदीच्या दरात होत असल्याने सोन्याचांदीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी १३५२७, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचली आहे. तोळ्याबाबत दर २४ कॅरेटमागे ११०० रूपयांनी, २२ कॅरेटमागे १००० रूपयांनी, १८ कॅरेटमागे ८२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५२८०, २२ कॅरेटसाठी १२४०००, १८ कॅरेटसाठी १०१४६० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसी+एक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात तब्बल १.१६% वाढ झाल्याने दरपातळी १३५७५१ रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३५२८, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचले आहेत. गेल्या १० दिवसात सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ३०० रूपयाने, २२ कॅरेटसाठी २५० रुपयांनी वाढले आहेत.


संपूर्ण डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास सोने ४% उसळले असून आज सोन्याने १३५००० पातळीही पार केली. तर जागतिक स्तरावर पाहिल्यास गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.१८% वाढ झाली असून जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात १.४८% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दर आज ४४०३.१८ औंसवर गेला आहे.


आज मोठ्या प्रमाणात सोने वाढण्याचे महत्वाचे ट्रिगर कुठले?


१) आज प्रामुख्याने डॉलर निर्देशांकातील दबाव घसरला ज्यामध्ये डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणूक म्हणून सोन्यातील दबाव वाढला


२) भूराजकीय स्थितीत स्थिरतेकडून पुन्हा एकदा अस्थिरतेकडे वाटचाल,आशिया खंडात इस्त्राईल इराण यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्यातील पुरवठ्यात दबाव वाढला.


३) युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरावर पुन्हा एकदा कपातीचे संकेत मिळाल्यावर सकारात्मक भावनेत वाढ


४) युएस आणि व्हेनेझुएला यांच्यातील संभाव्य संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली दरम्यान पुरवठा मर्यादित राहिला आहे.


५) सोने एक सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून वाढलेला गोल्ड स्पॉट व्यवहार


६) ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) झालेली वाढ


७) आरबीआयकडून वाढलेले हेजिंग


८) अस्थिरतेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून भारतीय गुंतवणूकदारांनी वाढवलेली सोन्यातील गुंतवणूक


या एकत्रित कारणांमुळे आज सोन्यात भारत व संपूर्ण आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान चीनने ही आपला व्याजदर कायम ठेवल्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात आज सोन्याच्या मागणीत आणखी वाढ झाली होती. वाढलेल्या मागणीचा परिणाम म्हणून या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावात ६७% वाढ झाली आहे. ज्यामुळे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत आणि प्रति डॉलर ३००० औंसवर वाढ झाली असून आणि ४००० डॉलरचे टप्पा प्रथमच ओलांडला गेला आहे ज्यामुळे तज्ञांच्या मते १९७९ नंतरच्या सर्वात मोठ्या वार्षिक वाढीसाठी सोने सज्ज होत आहे.


चांदीच्या दरातही मोठी वाढ !


चांदीच्या दरातही आज प्रचंड वाढ झाली आहे. युएस फेड दरातील व्याजदरातील कपात वर्तवली जात आहे. तसेच वाढलेल्या औद्योगिक मागणीसह वाढलेली सिल्वर स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे चांदीला कमोडिटी म्हणून मागणीत वाढ झालेलीच आहे परंतु युएसने मौल्यवान धातूत चांदीचा समावेश वाढल्याने सोन्याहून किंबहुना अधिक पातळीवर दिवसेंदिवस चांदीचे आकर्षण व मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून युएस आणि व्हेनेझुएला अस्थिरतेचे निमित्त साधल्याने चांदीने आज ऐतिहासिक पातळी गाठली आहे.


'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ५ रूपयांनी, प्रति किलो दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर २१९ रूपयांवर व प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात १.९५% वाढ झाल्याने चांदी २१२५०० रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर आज २१९० रूपयांवर, प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. तर जागतिक स्तरावरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात २.१७% वाढ झाली आहे.


चांदीत आणखी वाढ का होत आहे?


१) चांदीच्या साठ्यांची कमतरता


२)मजबूत औद्योगिक मागणी


३) अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या यादीत समावेश यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि ती २.३९% वाढून २०८,४३९ वर स्थिरावली.


४) ईटीएफमधील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण किरकोळ खरेदीमुळे याला आणखी गती ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये पुरवठ्यात संरचनात्मक तूट निर्माण होण्याच्या अपेक्षांना बळकटी मिळाली आहे असे तज्ञांचे मत आहे.


५) सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा-सेंटर पायाभूत सुविधांमधील औद्योगिक वापर वाढतच आहे.


६) चांदीच्या दरात पुढे काय अपेक्षित- जागतिक खाण उत्पादन आणि इतर कार्यात चांदीचा पुनर्वापर गेल्या दशकाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. परिणामी, चांदीचे बाजार सलग पाचव्या वार्षिक तुटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तज्ञांचे मत आहे की, एकूण तूट येणाऱ्या काळात ८०० दशलक्ष औंसच्या जवळ पोहोणार आहे.


एकाच आठवड्यात चांदी प्रति किलो २०००० हून अधिक पातळीवर उसळली आहे. त्यामुळेच स्पॉट चांदीच्या दरात ३% पेक्षा जास्त वाढ होऊन तो प्रति औंस ६९.४५४५ डॉलर पातळीच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला, तर चांदी फ्युचर्सने प्रति औंस ६९.५१५ डॉलरचा उच्चांक गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अमेरिकेच्या व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता वाढल्याने भौतिक मालमत्तेच्या मागणीलाही चालना मिळाली आहे.

Comments
Add Comment

Gujarat Kidney and Super Speciality Hospital IPO Day 1: पहिल्याच दिवशी गुजरात किडनी व सुपर स्पेशालिटी आयपीओ 'खल्लास' १.३१ पटीने सबस्क्रिप्शन पूर्ण

मोहित सोमण: पहिल्या दिवशीच गुजरात किडनी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लिमिटेड आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'ख्रिसमसची' तयारी जोरात,आयटी, मिडकॅप, मेटल शेअरची कमाल! सेन्सेक्स ६३८.१२ निफ्टी २०६.०० अंकाने उसळला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: शेअर बाजारात अखेरच्या सत्रात आणखी झाल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी वाढ नोंदवली आहे.

हिंगोली जिल्ह्यात महायुतीचा डंका, तिन्ही नगरपरिषदांवर महिला नगराध्यक्ष

हिंगोली : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप सर्वात मोठा

Maharashtras 288 Municipal Election Result 2025 : राज्यातील २८८ नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सविस्तर

मुंबई: राज्यात २८८ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. भाजपने कोकण

विजयाने मातू नका, माजू नका!; मुख्यमंत्र्यांनी दिला नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना कानमंत्र

मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला असून, विजयाचा जल्लोष साजरा करताना